*सांताक्लाँज आणि 31 डिसेंबर विषयी  अंनिसची भूमिका* ( *"चला उत्तर देऊया" टीम* )
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
1) प्रश्न : सांताक्लाँजने आज पर्यंत कोणाला गिफ्ट दिलय? तुम्ही सांताक्लाँजला प्रत्यक्षात बघितलय? अंधश्रध्दा र्निमूलनवाले ख्रिसमस वेळी प्रदर्शन करणार का ? का फक्त हिंदु धर्मातच लुडबुड करता येते ? का फक्त हिंदु धर्मातच अंधश्रद्धा दिसतात ?

उत्तर : सांताक्लाँज हा कोणी दैवी पुरुष नसून घरातील कोणीतरी एक व्यक्ति सांताक्लाँज बनून भेटवस्तू देतो, हे जगातील समस्त ख्रिस्ती बांधव (भारतातील 2 टक्के ख्रिस्ती व अन्य धर्मीय सुद्धा) जाणतात. पण असा प्रश्न विचारणाऱ्या विद्वानाला एवढे सुद्धा माहित असू नये ? कदाचित या अज्ञानातूनच  हा प्रश्न विचारला गेला असावा.
सांताक्लाँज हिंदू (80 टक्के) मधील भोंदू लोकांसारखी भोंदुगिरी, करणी, कालसर्प योग, राशिभविष्य  वगैरे करून लोकांना लुटत नाही, शुभ-अशुभाची भीती घालून बायकांचे लैंगिक शोषण करीत नाही. अशी सांताक्लाँजची केस असल्यास माहिती द्या. अंनिस त्यावर लक्ष केन्द्रित करून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करेल.

*हिंदुंमधील पुरोहित, भगत, बाबा-बुवा ह्या वर्गानीही दक्षिणा, कोंबडं-बकरे न घेता अशा भेटवस्तू घरोघरी दिल्या पाहिजेत. त्याने त्यांची प्रतिमा उजळ होईल व लहान मुलांतही ही मंडळी सांताक्लॉजप्रमाणेच लोकप्रिय होतील.*

2) प्रश्न : रात्री १० नंतर फटाके वाजवायचे नाही असा आदेश (?) असूनही ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता फटाके वाजवून देणारे पर्यावरणपुळके कुठेयत? शाळेतील लहान मुलांना फटाके विरहित दिवाळी साजरी करायच्या शपथा देणारे शपथवीर कुठेयत? शाळेतील लहान मुलांना आवाजमुक्त दिवाळी साजरी करायच्या शपथा देणारे शपथसुंभ कुठेयत? इत्यादी, इत्यादी..

उत्तर : अशी कोल्हेकुई करणाऱ्यांना खरं तर ध्वनीप्रदुषणाशी वगैरे काही देणंघेणं नाही. दुसरा बेवडा नाच करतोय, त्याला काही न बोलता मलाच का दारुडा बोलताय, अशी निव्वळ पोटदुखी आहे.
दुसरी गोष्ट, आपल्या आनंदासाठी फटाके फोडणे याचा अर्थ सरळसरळ पैसे जाळणे असा आहे. मग कोणीही ते जाळो... चुकीचेच आहे. पण तुलनाच करायची झाली तर दिवाळी खेड्यापाड्यापर्यत फटाके फोडूनच साजरी होते, तसा ३१ डिसेंबर किती ठिकाणी साजरा होतो ? आणि फटाकेमुक्त दिवाळीसाठी आवाहन करणारे, ३१ डिसेंबरला फटाके वाजवताना किंवा फटाक्यांना प्रोत्साहन देतांना दिसतात का ? दिसले तर नक्की सांगा. उगाच शब्दाचे अटाँमबाँम्ब फोडून आपले हसे करून घेऊ नका.

3) प्रश्न : 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या तुळशीखाली दिवा लावणाऱ्या हिंदुंना अंधविश्वासी म्हणणारे  25 तारखेला प्लास्टिकच्या झाडावर बल्ब लावून स्वतःची आधुनिकता दाखवतील. असा दुटप्पीपणा का ?

उत्तर : तुळस या रोपात काही औषधी गुण असले तरी ती 24 तास ऑक्सीजन देते हे शास्त्रीय दृष्ट्‍या सिद्ध झालेले नाही. असल्यास पुरावे द्यावेत. समजा वादासाठी ते खरे मानले तर तिथे दिवा लावून तुळशीने निर्माण केलेला तथाकथित ऑक्सीजन दिव्याद्वारा नष्ट करणे हा केवळ अंधविश्वासच नाही तर मूर्खपणा आहे.
आपल्याकडे दिवाळीला जसे आकाशदिवे, आकाशकंदिल लावून रोषणाई करतात (त्यास कोणी अंधश्रद्धा म्हणत नाही) तशीच रोषणाई 25 तारखेला प्लॅस्टिक च्या झाडावर बल्ब लावून करतात. गुणात्मक दृष्ट्‍या दोघात काही फरक नाही.

पण तथाकथित संस्कृतिरक्षक 'आमच्या तुळशीपुजनाला नावं ठेवता तर प्लास्टिक झाडांच्या रोषणाईला नावं ठेवा असं सुचवुन आपला दांभिकापणाच उघड करत असतात. त्यांचे हे म्हणणे म्हणजे, शेजारचा फाटलेल्या जिन्सची फँशन करतोय, तर मी नागडं राहिलं तर बिघडलं कुठे ?

हिंदुत्ववादी अंधभक्तांच्या माहितीसाठी : *अंनिस तर्फे ख्रिसमस निमित्त फटाकेमुक्त तसेच दारूबंदी अभियान 'व्यसनाला बदनाम करूया' या नावाने चालू आहे. नुसता द्वेष आणि आरोप हे तर फक्त कमअस्सल माणसेच करू शकतात. तेव्हा या अभियानात सहभागी होऊन हिंदुत्ववाद्यांनी लोकांना सजग केले तर अंनिस त्यांचे स्वागतच करील. आणि हो, या ‘ख्रिस्ती’ उत्सवात दुर्दैवाने कोट्यावधी हिंदूच दारू ढोसत असतात हे कटू वास्तव अंनिसवर बेछूट आरोप करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनीही लक्षात घ्यावे, आणि अंनिसच्या या अभियानाला हातभार लावावा. कारण अंनिस कुणालाही अस्पृश्य समजत नाही. विचार तर कराल...*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य