संन्याशाचा शाप वाईट असतो, चिदंबरम साहेब ..!!

संन्याशाचा शाप वाईट असतो, चिदंबरम साहेब ..!!

दिवाली की रात को कांची कामकोटि पीठ के बेगुनाह शंकराचार्य जयेंद्र सरस्वती शंकराचार्य को सोनिया गांधी के कहने पर गृह मंत्री चिदंबरम के आदेश पर गिरफ्तार किया गया था ।

हत्याकांड की साजिश रचने के आरोप में दीपावली की रात में आंध्र प्रदेश से गिरफ्तार किया गया । तब पूरे देश में खूब हंगामा हुआ । कहा तो यह भी जाता है कि तत्कालीन राष्ट्रपति प्रणब मुखर्जी ने प्रधानमंत्री मनमोहन सिंह को कॉल भी किया था, और इस पर अपना विरोध प्रकट किया था ।

बाद में कोर्ट से कांची कामकोटि पीठ के शंकराचार्य जयेंद्र सरस्वती शंकराचार्य बाइज्जत बरी हुए थे ।और बेगुनाह साबित हुए थे ।

आज समय के चक्र ने पूरा चक्कर लगा कर  उसी चिदंबरम को गिरफ्तार होते देखा है, जिसने सत्ता के मद में चूर हो कर हिन्दूओं के सर्वोच्च धार्मिक सन्त को प्रताड़ित किया था ।

चिदंबरम और सोनिया को आज पता चला होगा कि  समय बहुत बलवान है l

*संन्याशाचा शाप वाईट असतो, चिदंबरम साहेब..!!* या पोस्टला उत्तर: 
चिदम्बरम त्यांच्यावर लावलेल्या आरोपामुळे अटकेत आहेत. कायदा आपले काम करील. त्या विषयी सुख दुख नाही. परंतु, त्याचा संबंध संन्याशाच्या शापाशी जोडणे हे तेवढेच मूर्खपणाचे आहे जेवढे करकरे यांच्या मृत्युचा संबंध एका साध्वीच्या शापाशी जोडणे. *संबंधित पोस्ट एक फालतू, खोटी व बिनबुडाची पोस्ट आहे.* कारण: 
१) कांची कामकोटी आश्रमात एक खून झाला होता. त्याची कहाणी पुढील लिंक मध्ये वाचावी (https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20041129-kanchi-shankaracharya-jayendra-saraswati-arrested-for-murder-788845-2004-11-29) विचारी मनुष्याने ती वाचल्यास अनेक ‘अवघड’ प्रश्न पडतील, बर्‍याच बाबी उघडकीस येतील. 
२) त्या खून प्रकरणात शंकराचार्यांना *तामिळनाडू  पोलिसांनी* दिनांक ११.११.२००४ रोजी अटक केले होते. त्यावेळी जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. भारताचे गृहमंत्री होते सुशीलकुमार शिंदे! *चिदम्बरम त्यावेळी गृहमंत्री नव्हते!* तसेच भारताच्या गृहमंत्र्यांचा या अटकेशी काही संबंध असेल असे काही आढळून येत नाही. कारण यात सीबीआय कुठेही दिसत नाही. या विषयी पुढील लिंक पहावी (https://en.wikipedia.org/wiki/Minister_of_Home_Affairs_(India))
३) यावरून, प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना फोन केला ही बाब नक्कीच खोटी असावी वाटते. कारण राज्यांच्या पोलिसांच्या कामात अशी ढवळाढवळ करता येत नाही, एवढे तरी मुखर्जी यांना कळत असावे असा अंदाज आहे. 
४) पुरावे न सापडल्याने शंकराचार्य निर्दोष सुटले. जर चिदम्बरम असेच सुटले (कोळसा, 2जी मध्ये अटक केलेले लोक सुटलेच की!) तर या शापाचे काय करणार?

कॉंग्रेस विरोध व्यक्त करण्यासाठी त्यांची असंख्य दुष्कृत्ये समोर असतांना असल्या बादरायण संबंध जोडणार्‍या, खोट्यानाट्य व धार्मिक स्वरुपाच्या कथा बनवणे व शहानिशा न करता त्या पसरवणे सुशिक्षित आणि जबाबदार लोकांना तरी शोभत नाही. असे करून स्वतःच्या धर्मातील नेतृत्वाचे अवमूल्यन होते एवढे भान तरी अशी पोस्ट बनवणार्‍यांना असले पाहिजे.
- उत्तम जोगदंड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य