🤔खरच विचार करायला लावनारी पोस्ट. खरी अंधश्रद्धा कोणती ?😳 अंधश्रद्धा निर्मूलन 📣।।होय निर्भीडच।।📣 फुले, शाहू, आंबेडकर यांनी शिवरायाना मानले शिवरायांनी संत तुकारामाना मानले, संत तुकाराम महाराज यानी विठ्ठलपांडुरंगाला मानले, पांडुरंग दगडाचा देव, त्या मुर्तीला पूजतो मी, समंजसपणे सांगतो मी, दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. ! माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी, का? --अन्नदान होते --दवाखाना चालतो --शिक्षण संस्था चालते --परिसराचा विकास होतो आणि हो-- -देव/मंदिर फक्त भटजीसाठी नसतात हो -! -- मुर्तीकार -- फुलझाडे लावणारा शेतकरी -- फुले विकणारा माळी -- बेल आणणारा मजूर -- बेल विकणारा गुरव -- नारळ, प्रसाद विकणारा दुकानदार -- हॉटेल चालक -- स्टेशन वरून भक्तांना मंदिरापाशी आणणारा रिक्षा चालक -- मंदिर बांधणारे ईंजिनिअर, गवंडी, मजुर हे सर्वजण काही भटजी नसतात हो या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो हो ! म्हणून मायच्यान सांगतो, या सर्वात देवत्व शोधणारा माणूस आहे मी-! दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी -! दानपेटी घेऊन फिरत नाही दारोदारी "पूजा करा ...
पोस्ट्स
शस्त्रपूजन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शस्त्रपूजन शास्त्रोक्तच हवे ! संपादकीय देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये ‘राफेल’या लढाऊ विमानाचे पूजन करतांना विमानाच्या चाकांपुढे लिंबू ठेवले. पूजन करतांना लिंबू ठेवल्याने त्याचा परिणाम भारतातील काँग्रेस पक्षासह धर्मनिरपेक्ष, तथाकथित पुरोगामी, हिंदु धर्मविरोधी आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर तितकाच परिणामकारक झाला. पूजनातील लिंबाच्या शक्तीचा परिणाम एवढा होता की, वर उल्लेखलेल्या सर्वांनाच त्याचा पोटशूळ उठला. त्यातून दिवसभर सर्वांनी त्यावर स्वतःची नास्तिक आणि पुरोगामी मते प्रसारमाध्यमे अन् सामाजिक माध्यमे यांतून व्यक्त करण्यास प्रारंभ केला. या सर्वांतून देशातील जनतेच्या पुन्हा लक्षात आले की, आस्तिक कोण आहेत आणि हिंदु धर्मातील परंपरांना विरोध करणारे कोण आहेत ? खरेतर संरक्षणमंत्र्यांनी लढाऊ विमानाचे विधीवत् पूजन केले, त्यासाठी त्यांचे आणि केंद्रातील भाजप सरकारचे अभिनंदन ! काँग्रेसवाल्यांना पोटशूळ का ? पूजेत लिंबू ठेवल्यामुळे काँग्रेसने या प्रकाराला ‘तमाशा’ आणि ‘ड्रामा’, पुरो(अधो)गाम्यांनी त्याला ‘अंधश्रद्धा’ म्हटले. धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामीपणा यांचा डांगोरा पिटणारे,...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हे परम ईश्वरा... कुठे असशील खरोखर तर, आणि हे स्वगत, अनामिक अज्ञात लहरींद्वारे जर पोचत असेल तुझ्यापर्यंत, तर काही मागायचं आहे रे तुला.. छोट्या छोट्या लेकरांना पोटभर खायला मिळू दे रे सर्वांच्याच..कुपोषणानं हाल हाल होऊन मरण्याइतकी चूक तरी काय असते त्यांची? लहान लहानग्यांना कोणीही ओरबाडून ओचकरून लचके तोडून फेकू देऊ नये रे, या साठी कर ना काहीतरी..कर ना त्यांच्या वासनेचं रूपांतर ममतेत.. सगळे श्वास,आभास,फुलांच्या फुलण्यापासून ते ग्रहताऱ्यांचं भ्रमण ही तूच नियंत्रित करतोस ना? मग पोटाच्या टीचभर खळग्यासाठी वेश्या बनून एका रात्रीत दहा जणांना अंगावर घेण्याचं दुःख एकाही स्त्री वर येऊ नये यासाठी काही करता येतंय का बघ.. तू कर्ता करविता आहेस ना? मग सगळं शोषणही तूच घडवून आणतोस असं आम्ही समजायचं का? मुलगा हवाच म्हणून एकामागून एक मुली जन्माला घालत राहून एखादया बाळंतपणात चुपचाप मरून जाणाऱ्या बायका तुझ्यासारख्या विघहर्त्याला आयुष्यभर पूजेत आलेल्या असतात रे,एकही उपवास सोडत नाहीत बापूडया. तुझ्या सर्वशक्तिमान स्वरूपाचं दर्शन घडवून तू आता हे जग सावरायलाच हवंस.. केवढे ते अणुबॉ...
प्राचीन भारतीय विज्ञान?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हल्ली सोशल मीडियातून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट पसरवण्याचा एककलमी कार्यक्रमच काही लोकांनी हातात घेतला आहे. हे लोक सतत खोटी, अवैज्ञानिक, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी माहिती पसरवतात आणि त्याला विशेषकरून शिकले सवरलेले लोक बळी पडतात. त्यामुळे या खोटेपणाला उघडे करत राहणे हे एक कामच लागून राहिले आहे. आता आणखी एक लेख सोशल मीडियातून फिरत आहे. तो लेख खाली देत आहे. आणि त्या लेखातच कंसामध्ये प्रत्येक मुद्द्याला उत्तर देत आहे . आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे का ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे का ? ( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) (लेखाच्या शीर्षकातच खोटेपणा! वेद आणि प्राचीन ज्ञानाला संपूर्ण थोतांड कोणीच म्हणत नाही. त्यातील काही गोष्टी आजच्या काळात टिकत नाहीत, काही गोष्टी अवैज्ञानिक, काही गोष्टी विषमतावादी आहेत असे विवेकवादी लोकांचे म्हणणे आहे. प्राचीन ग्रंथांना ज्ञानाचा स्रोत मानणे, त्यानंच प्रमाण मानणे, त्यातच विज्ञान आहे असे मानणे चुकीचे आहे इतकेच आमचे म्हणणे आहे.) सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नासाने चंद्रावर झेप घेण्यासाठी अनेक मोहीम केल्या त्यात अपोलोचा विशेष सहभाग होता. परंतु यशस्वी झालेली पहिली मोहीम survyeyor 1 ही आहे. जी दिनांक 30 मे 1966 रोजी घेण्यात आली. त्यादिवशी निर्जला एकदशी होती. नासाने असंख्य मोहिमा केल्या आहेत. त्यापैकी काही मोहिमा इथे मांडत आहेत. ज्या एकादशी दिवशी झाल्या आहेत. एकादशी दिवशी अनेक मोहिमा झाल्या आहेत. पण प्रत्येक गोष्टीचा शोध प्रत्येकाने घ्यावा.पण काही महत्त्वाच्या मोहिमा मांडत आहे. 11 जुलै 2011 - स्पेस शटल अटलांटीसा 14 एप्रिल 1981- स्पेस शटल कोलनबिया जे मानवविरहित होतं आणि 11 नोव्हेंबर 1982 ला सेम मोहीम मानवरहीत केली. 9 एप्रिल 1983- स्पेस शटल चॅलेंजर 5 सप्टेंबर 1984- स्पेस शटल डिस्कव्हरी 13 सप्टेंबर 1959 - सेकंड सोव्हिएत रॉकेट भारतीय पंचांग आणि वातावरण याचा खूप जवळचा संबंध आहे. हे खूपजणांना माहित नसेल. भरतीची वेळ पंचांगातल्या तिथीला ३/४ ने गुणून जो आकडा येतो त्याच्या आसपासच्या घड्याळाच्या वेळेला असते. हे माहित असेलच ! एकादशी आणि चतुर्थी या दोन तिथी पोर्णिमा आणि अमावस्ये पासून समान अंतरावर असतात. या तिथींच्या दिवशी चंद्र आणि सूर्य यांची...