शस्त्रपूजन
शस्त्रपूजन शास्त्रोक्तच हवे !
संपादकीय
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये ‘राफेल’या लढाऊ विमानाचे पूजन करतांना विमानाच्या चाकांपुढे लिंबू ठेवले. पूजन करतांना लिंबू ठेवल्याने त्याचा परिणाम भारतातील काँग्रेस पक्षासह धर्मनिरपेक्ष, तथाकथित पुरोगामी, हिंदु धर्मविरोधी आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर तितकाच परिणामकारक झाला. पूजनातील लिंबाच्या शक्तीचा परिणाम एवढा होता की, वर उल्लेखलेल्या सर्वांनाच त्याचा पोटशूळ उठला. त्यातून दिवसभर सर्वांनी त्यावर स्वतःची नास्तिक आणि पुरोगामी मते प्रसारमाध्यमे अन् सामाजिक माध्यमे यांतून व्यक्त करण्यास प्रारंभ केला. या सर्वांतून देशातील जनतेच्या पुन्हा लक्षात आले की, आस्तिक कोण आहेत आणि हिंदु धर्मातील परंपरांना विरोध करणारे कोण आहेत ? खरेतर संरक्षणमंत्र्यांनी लढाऊ विमानाचे विधीवत् पूजन केले, त्यासाठी त्यांचे आणि केंद्रातील भाजप सरकारचे अभिनंदन !
काँग्रेसवाल्यांना पोटशूळ का ?
पूजेत लिंबू ठेवल्यामुळे काँग्रेसने या प्रकाराला ‘तमाशा’ आणि ‘ड्रामा’, पुरो(अधो)गाम्यांनी त्याला ‘अंधश्रद्धा’ म्हटले. धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामीपणा यांचा डांगोरा पिटणारे, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे आणि प्रगत राष्ट्रांचे गोडवे गाणारे त्यांच्या उद्घाटनाच्या पद्धतीविषयी मात्र कुठेही चर्वितचर्वण करतांना दिसत नाहीत. अगदी प्रगत आणि अप्रगत देशांमध्ये लढाऊ विमानांचे पूजन केल्याच्या अनेक घटना आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले, तर अमेरिका, ब्रिटन यांसारख्या देशात पोप किंवा फादर यांच्याकडून सैन्यातील विमानांचे पूजन करून त्यावर ‘क्रॉस’ काढला जातो आणि त्या वेळी बायबलचेही वाचन केले जाते. एवढेच नव्हे, तर तेथील सर्वसामान्य आणि श्रीमंत व्यक्तीही नवीन गाडी अथवा वास्तू खरेदी केल्यावर तिचे पूजन पाद्य्राच्या हस्ते करते अन् त्यांच्याद्वारे गाडीपुढे अथवा वास्तुप्रवेशाच्या वेळी बायबलचे वाचन केले जाते.
आखाती देशांमध्ये तेथील मौलवी किंवा मौलाना यांच्याकडून कुराणाचे आयात पठण करून लढाऊ विमानाचे उद्घाटन केले जाते आणि ते धर्मगुरु विमानाच्या काही विशिष्ट भागांपुढे जाऊन आयाते म्हणत धूप दाखवतात. या सर्व गोष्टींना पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसवाले अंधश्रद्धा किंवा तमाशा म्हणण्याचे धाडस दाखवणार का ? त्या वेळी पुरो(अधो)गाम्यांचे पुरो(अधो)गामीत्व कुठे गेलेले असते ? पाकिस्तानसारखा कट्टर आतंकवादी देश कोणत्याही नवीन लढाऊ विमानाचे उद्घाटन करतांना बकर्याचा बळी देतो. असे असतांना भारताने विमानाच्या चाकांखाली लिंबू ठेवले, तर त्याचे धर्मनिरपेक्षवाद्यांनी किंवा पुरोगाम्यांनी अवडंबर करण्याची कोणतीच आवश्यकता नाही.
या देशात सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेसवाल्यांनी उपभोगली. त्याच काँग्रेसच्या सत्ताकाळात ‘विक्रांत’ या लढाऊ जहाजाचे उद्घाटन तत्कालीन संरक्षणमंत्री ए.के. अॅन्टनी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी अॅन्टनी यांच्या पत्नी एलिझाबेथ यांनी जहाजाचे पूजन करतांना त्यावर ख्रिश्चन धर्मियांचा ‘क्रॉस’ काढला होता. अंनिसवाल्यांनी आताच्या संरक्षणमंत्र्यांची कृती म्हणजे देशाला काळीमा फासण्याचे काम म्हटले; पण याच अंनिसवाल्यांनी तत्कालीन काँग्रेसच्या संरक्षणमंत्र्यांच्या पत्नीने ‘क्रॉस’ काढल्यावर साधा ‘ब्र’ही उच्चारला नाही. संरक्षणमंत्र्यांनी विदेशात शस्त्रपूजन करून देशाचे नाव उज्ज्वल केले, तर अंनिसवाल्यांनी अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’कडून निधी घेऊन देशाच्या करातून उघडउघड चोरी केली. उलट अंनिसवाल्यांचेच हे गैरकृत्य देशाच्या नावाला काळीमा फासणारे होते. याविषयी अंनिसवाले बोलतील का ? धर्मनिरपेक्ष आणि हिंदु धर्मावर आगपाखड करणारे अनेक काँग्रेस नेते निवडणुकीत जिंकण्यासाठी करणी करणे, लिंबाचा किंवा अन्य गोष्टींचा उतारा देणे, काळ्या बाहुलीला सुया टोचणे, अमुक एखादा यज्ञ किंवा विधी करणे आदी अनेक गोष्टी करतात. स्वतःच्या स्वार्थासाठी सोयीस्कररित्या धर्माचा अपलाभ करून घेणार्या काँग्रेसवाल्यांना त्या गोष्टी ‘तमाशा’ किंवा ‘अंधश्रद्धा’ वाटत नाहीत. काँग्रेसवाल्यांनी शस्त्रपूजनाला ‘तमाशा’ म्हणून स्वतःची लायकी आणि त्यांची वैचारिक पातळी किती हीन स्तराची आहे, तेच दाखवून दिले.
परंपरेतून शौर्यजागरण हवे !
खरेतर देशातील शस्त्रपूजनाची परंपरा ही पुरातन म्हणजे रामकृष्णादि यांच्या पूर्वीपासून आहे. अगदी अलीकडच्या शतकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनीही शस्त्रपूजन केल्याचे दाखले आढळतात. दसर्याच्या दिवशी शस्त्रे, लढाऊ विमाने, जहाज, रणगाडे, बंदुका, संगिनी, तलवारी यांचे पूजन करून सर्वसामान्य भारतीय, सैनिक आणि भावी पिढी यांच्यामध्ये एकप्रकारे शौर्यजागरणच केले जाते. भारतियांची शस्त्रपूजनाची हीच शौर्यपरंपरा आज पाश्चात्त्य देशांनी घेतली आहे. आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी हिंदूंच्या पराक्रमी राजांचा इतिहास आणि त्यांनी केलेले शौर्य न शिकवता हिंदु अधिकाधिक षंढ कसे बनतील, यांसाठीच प्रयत्न केले. त्यांना शस्त्रपूजन आणि शौर्यजागरण कसे कळणार ? संरक्षणमंत्र्यांनी फ्रान्समध्ये पूजन केले, त्या वेळी तेथील अनेक अधिकारी आणि नागरिक यांनी जिज्ञासूपणे ते पूजन कुतूहलाने जाणून घेतले. आज हिंदु धर्मानुसार करण्यात येणार्या प्रत्येक पूजनामागील शास्त्र, धर्माचे ज्ञान जाणण्याची आणि त्याद्वारे उपासना करणार्यांची संख्या वाढत आहे. लढाऊ विमानाचे पूजन करतांना राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवले होते. चाकाखाली ‘लिंबू’ ठेवले आणि त्यावरून चाक गेल्यावर ते लिंबू फुटले की, वातावरणातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात, असे हिंदु धर्मातील शास्त्र सांगते. ती शक्ती न्यून झाली की, त्याचा परिणाम सकारात्मक कार्य घडण्याकडे होतो. येथे राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याने देशातील नकारात्मक शक्तींना चुचकारले गेले आणि देशातील हिंदूंमध्ये सकारात्मकता वाढली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंच्या परंपरांना उजाळा देत देशातील हिंदूंमध्ये शौर्य निर्माण करावे, हीच अपेक्षा !
© Sanatan Prabhat - All Rights Reserved
---------
१)हिंदू धर्मात कुठल्या पुजेत लिंबू लागतो? हिंदू धर्मात लिंबू करणी,काळी,जादू,उतारा,नजर उतरवणे ह्या अंधश्रद्धा पायीच वापरतात.संरक्षण मंत्री यानीही तो अंधश्रद्धा पायीच वापरला.आणी मा.पंतप्रधान मोदीच्या तंत्रज्ञान युक्त भारत देश यावर काळीमा फासून मोदीजीचाही जाहिर अपमान केलेला आहे.मोदीजी जाहीर भाषणात लिंबू मिर्ची गाडीला लावणे ही अंधश्रद्धा आहे असे बोललेले आहेत.
2)इतर देशाचा आपण विचार करायची गरज नाही आपला देश धर्मनिरपेक्ष देश आहे आपल्या देशात देशाचा कारभार धर्माच्या आधारे चालत नाही. शासकीय ठिकाणी कुठल्याही धर्माचे कार्यक्रम करायचे नाही असे स्पष्ट आदेश आहेत.
3)राज्यघटना आपल्या देशात आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचार,प्रसार,अंगीकार हे सर्वांना मूलभूत कर्तव्य म्हणून करायला सांगितले आहे.हे संरक्षण मंत्री यानी केलेले नाही.त्यानी केले नाही पण अंनिसने संरक्षण मांत्री याना जाब विचारुन मूलभूत कर्तव्य पालन केले.
४)अंनिसला महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार मिळाला तो कायदेशीर रीत्या नियमानुसार घेतलेला आहे.ती रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन साठी चमत्कार करणाऱ्या साठी जाहीर आव्हान म्हणून वापरली आहे. सनातन सहीत कुठाल्याही धर्माच्या बाबा बुवा,तांत्रिक ,मांत्रिक यानी चमात्कार सिद्ध करायचे आव्हान घेतले नाही.उलट आंनिसने त्याना उघडे पाडाले आहेत.
५)डाँ.दाभोलकर सहीत,समाजसुधारकांचे खून करण्यात ज्याचे साधक व सनातन संस्था आहे.हे देशविधातक कृत्य नाही का? सनातन वाल्यानी असे अंधश्रद्धा बाबत प्रश्न विचारुच नये.कारण त्याना अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धा वाटत असतात.आताचे लिंबू हे त्याचेच प्रतिक आहे.
६)शिवाजी महाराजांचे नाव घेतात पण महाराजानी सर्व लढाया मुहर्त न बघता आमावास्याच्या रात्री गनिमी कावा (सर्जिकल स्ट्राईकने)विवेकी विचारानी जिकल्या आहेत.
७)केंद्रातील भाजप सरकार सर्व धार्मिकचे सरकार आहे.एका धर्माचे नाही.हे मुर्खाना कधी कळेल तेच जाणे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा