तांब्या पितळेच्या भांड्यांनी पाणी स्वच्छ होते?
तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ? Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33 सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ? ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख. २००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल देता येणे शक्य नव्हते. हा मुद्दा होता, जर गावातील पाणी अश्या प्रकारे दुषीत अ सेल तर ही जनता हेच पाणी वापरून तग तरी कशी धरून आहे? जर ह्या पाण्या बद्दल जनतेला माहीती असती तर जनेतेने ते पाणी शुद्ध करण्यासाठी एका तरी treatment चा पर्याय निवडला असता. ह्या पर्यायत पाणी उकळवणे, पाणी शूद्धी करणासाथी ULTRA Violet उपकरणाचां वापर करणे. पण ही ठरली जनता ज्यांची एका वेळेची जेवायची मारामार तेथे पाणी शूद्धीकरण...