पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात?

ख्रिश्चन धर्मातील लोक काय करतात माही आहे? आपले लहान मूल झोपलेले असतानाच त्याच्या ऊशाशी एक खेळणे आणून ठेवतात. सकाळी ते मूल झोपेतून ऊठल्यावर त्याचे लक्ष खेळण्याकडे जाते. ते आपल्या आई वडिलांना विचारतं :- "हे खेळणे कुणी आणले"? तेव्हा त्याचे आईवडील सांगतात की, "रात्री येशू आले होते, त्यांनी तुझ्यासाठी हे खेळणे आणले". त्या दिवसापासून त्या मुलाचा येशूवर एवढा विश्वास बसतो की तो शेवटपर्यंत येशूला विसरत नाही. परंतु वारकऱ्यानो कधी पंढरपूरला गेलात तर एखादं खेळणं पोरासाठी घेऊन येऊ नका. *आणि एखाद्या यात्रेतून मुलांसाठी खेळणी आणलीत तर त्याला स्पष्ट सांगा की हे तुझ्यासाठी विकत आणलंय. बघा काय परिणाम होतो तर.* *त्याला कळेल की कुठलाच देव अशी खेळणी देत नसतो.* देवावरची त्याची श्रद्ध कमी होणार नाही.  *पण देवाच्या नावाने त्याची अशी मानसिक फसवणूक ही होणार नाही. तो अधिक विवेकी, बुद्धीवादी व कर्तृत्ववान बनेल. त्याची हौस मौज तो देवाकडे प्रार्थना करून नव्हे, तर स्वबळावर मेहनतीने पूर्ण करेल.* *त्या पोराची देवा धर्माच्या नावाने आयुष्यात कधीच फसगत होणार नाही. तो खरा श्र...
🎅 *सांता बंता सगळ्या अंधश्रद्धा आहेत भाऊ.."* - *एवढं सांगायला अंनिस वाले ☠ दरवर्षी कसे काय विसरत असतील बुवा? 🤔याची फक्त आठवण करून द्यायची होती.* 🤩 बाकी काही नाही.. ~~~~~~ याला उत्तर अंनिस शोषण करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करते. सांता बंता ही अंधश्रद्धा आहे हे सर्व ख्रिस्ती लोकांना माहिती आहे. कारण त्यांना तेवढी अक्कल आहे.  सांता बंता या अंधश्रद्धेने कुणाचे शोषण होत असल्याचे आढळल्यास व प्रकरण पुराव्यासह अंनिस कडे आणल्यास,  अंनिस त्यावर नक्कीच कारवाई करणार! उद्या संताक्लाॅज प्रमाणेच आमच्याकडे येणारे गुरूजी भेटवस्तु का देत नाहीत? उलट शिधा व दक्षिणा का घेऊन जातात? असा प्रश्न जनतेला पडल्यास काय करावे हे हि सांगा. फक्त ‘आपले ठेवावे झाकून, दुसर्‍यांचे पहावे वाकून’ ही वृत्ती कुजकट कॉमेंट करणार्‍यांनी सोडावी! बाकी काही नाही..
'हिंदू सण आणि स्वघोषित लिबरलांचे अरण्यरुदन' या शेफाली वैद्य यांच्या व्हायरल होत असलेल्या लेखाला उत्तर. उत्तर त्यांच्याच लेखामध्ये कंसात दिले आहे. खाली आहे त्यांचा व्हायरल होत असलेला लेख जसाच्या तसा आणि त्याला उत्तर कंसामध्ये. एक काळ असा होता जेव्हा वर्षभराचे हिंदू सण कुठल्या दिवशी येतात हे बघण्यासाठी मला  कालनिर्णय विकत घ्यावं लागायचं. पण सोशल मीडियावर सध्या स्वघोषित लिबरलांचा इतका सुळसुळाट झालाय की हल्ली मला ट्विटर आणि फेसबुकवरून सगळं पंचांग समजतं. 'सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पाणी वाचवा' हा संदेश त्याच त्या भेगा पडलेल्या मातीच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांवर हात ठेवून आभाळ न्याहाळणाऱ्या शेतकऱ्याच्या श्वेतशाम चित्रसकट जिकडे तिकडे  फिरायला लागला की समजावं, 'अरे वा, होळी महिन्यावर आली वाटतं'. मागे एका इंग्रजी मध्ये लिहिणाऱ्या पत्रकार जोडप्यामधल्या पतीने, 'ह्या वर्षी कोरडीच होळी खेळ हो, पाण्याचा किती दुष्काळ आहे' वगैरे टाहो ट्विटरवरून फोडला होता. त्याच्या दुर्दैवाने त्याच्या दोन-तीन दिवसच आधी त्याच्या बायकोने 'किती गरमी आहे ह्या वर्षी, पण माझ्या मोठ्...
*सांताक्लाँज आणि 31 डिसेंबर विषयी  अंनिसची भूमिका* ( *"चला उत्तर देऊया" टीम* ) 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 1) प्रश्न : सांताक्लाँजने आज पर्यंत कोणाला गिफ्ट दिलय? तुम्ही सांताक्लाँजला प्रत्यक्षात बघितलय? अंधश्रध्दा र्निमूलनवाले ख्रिसमस वेळी प्रदर्शन करणार का ? का फक्त हिंदु धर्मातच लुडबुड करता येते ? का फक्त हिंदु धर्मातच अंधश्रद्धा दिसतात ? उत्तर : सांताक्लाँज हा कोणी दैवी पुरुष नसून घरातील कोणीतरी एक व्यक्ति सांताक्लाँज बनून भेटवस्तू देतो, हे जगातील समस्त ख्रिस्ती बांधव (भारतातील 2 टक्के ख्रिस्ती व अन्य धर्मीय सुद्धा) जाणतात. पण असा प्रश्न विचारणाऱ्या विद्वानाला एवढे सुद्धा माहित असू नये ? कदाचित या अज्ञानातूनच  हा प्रश्न विचारला गेला असावा. सांताक्लाँज हिंदू (80 टक्के) मधील भोंदू लोकांसारखी भोंदुगिरी, करणी, कालसर्प योग, राशिभविष्य  वगैरे करून लोकांना लुटत नाही, शुभ-अशुभाची भीती घालून बायकांचे लैंगिक शोषण करीत नाही. अशी सांताक्लाँजची केस असल्यास माहिती द्या. अंनिस त्यावर लक्ष केन्द्रित करून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करेल. *हिंदुंमधील पुरोहित, भगत, बाबा-बुव...

स्वप्नातील सांता

आज भल्या पहाटे,गाढ स्वप्नाळू झोपेत होतो..... लांबून एक मनुष्यवजा आकृती माझ्याकडे येताना पुसटशी दिसु लागली.... लाल रंगाचा ठिपका आकार घेत घेत मोठा झाला....... तो सांताक्लॉज होता... मला म्हणाला, "वेक अप माय डिअर चाईल्ड, आय ह्याव ब्रॉट मेनी गिफ्ट्स अँड केक्स, आइस्क्रीम्स, चॉकलेट्स फॉर यु"... मी :(मराठीत) मला भेटवस्तु आणि खाऊ का देतोयस? आपली काय ओळख? सांता:   (थोडा विचार करुन इंग्रजीत)...'जीसस लव्हस् यु माय चाईल्ड, ही सेंट मी हिअर फॉर यु'... 'हि केअर्स यु',.. हि इज व्हेरी काइन्ड' मी: "बरं बरं असेल ब्वा तो जीसस मामा दयाळु"... "मग मला आवडेल ती खेळणी देशील?"... सांता: (मी भुललोय हे बघून आनंदाने मराठीत)..हो हो का नाही? सांग तुला कुठली खेळणी हवी आहे.... मी: मला ना आमच्या शाखेत असतो ना तसा छानसा मजबूत 'दंड' (काठी) दे, ज्याने मी दंडप्रहार करत असतो आणि शाखेतील खेळ खेळत असतो... सांता:(कपाळावर आठ्या आणून)...."बाळा, माझ्याकडे दंड नाहीये," तु दुसरे काही माग, मी देईल".. मी: बरं खेळणी जाऊदे, मला पुस्तक वाचायला ...

म्हणे मेणबत्या करतात फटाक्याहून जास्त प्रदूषण!

*🕯दिमाग की मेणबत्ती जलाव🕯* *"मेणबत्तीला करा राम राम" ही पोस्ट भक्तांकडून सगळीकडे व्हायरल करण्यात येत आहे* गम्मत पहा स्वतः आयुष्यभर दुसऱ्या धर्माचा दुस्वास करायचा आणि मेणबत्ती शिवाय का होईना, पण *ख्रिसमस साजरा करा* असे आवाहनही करायचे. आम्ही हिंदू आहोत  आणि म्हणे ख्रिसमस साजरा करा. *किती हा वैचारिक गोंधळ.🤥* मेणबत्ती वापरू नका हे सांगताना भक्तांनी एक फार मोठा अवैज्ञानिक शोधही लावला. म्हणे *"फटाक्यांपेक्षा मेणबत्ती जास्त प्रदूषण करते"* किती धडधडीत खोटं बोलू शकतात ही भक्त मंडळी. सध्या भ्रामक विज्ञानाचीच चलती आहे.  फटाका 0.4 gram  व मेणबत्ती 12 gram प्रदूषण करते? फटाका कुठला? कीती मोठा? की छोटा? ध्वनी प्रदूषणहि ग्रॅम मधेच मोजायचं? मेणबत्ती कीती कीलोची? कीती मुळ वजन?? काहीच तपशील नाही? *वैज्ञानिक दृष्टिकोन नसला की अश्या अर्थहीन पोस्ट फाॅरवर्ड होतात.* मेणबत्त्या घरात लावु शकतो. पण फटाके घरात वाजवु शकत नाही. यावरूनच प्रदूषण कशाने जास्त होते, हे स्पष्ट आहे. *शिवाय फटाक्यांचा कचरा होऊन माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या चिंधड्या उडतात ते वेगळेच.* मेणबत्तीमुळे खू...