*विचार चांगला आहे वाचला तर कळेल.*
🙏🙏🙏
*एकदा राजाने प्रधानाला अचानक तीन प्रश्न विचारले.*
*१) ईश्वर कुठे राहतो ?*
*२) ईश्वर कसा मिळेल ?*
*आणि*
*३) ईश्वर काय करतो ?*
*अचानक हे प्रश्न ऐकून प्रधान गडबडून गेला व म्हणाला या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देतो.*
*प्रधान घरी पोचला तेव्हा खुप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता, प्रधान म्हणाला ''बेटा आज महाराजांनी मला एकावेळी तीन प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत.*
*प्रधानाच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून चला, महाराजांना मी त्याची उत्तरे देईन. पुत्रहट्ट बघुन प्रधान दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला. प्रधानाला पाहून महाराजांनी म्हटले काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.*
*प्रधान म्हणाला "महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल "महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला ''सांग, ईश्वर कुठे राहतो?"*
*मुलाने विनंती केली की, महाराज, एक पेला दूध - साखर घालून आणा. दुध आणल्यावर मुलाने विचारले महाराज दूध कसे आहे महाराजांनी दूध चाखले व म्हणाले गोड आहे.*
*परंतु महाराज यात साखर दिसते का ? महाराज म्हणाले नाही कारण ती दुधात विरघळून गेली आहे. बरोबर महाराज!*
*तसा ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे चराचरातअसून तो दिसत नाही.*
*महाराज आनंदीत होवून म्हणाले मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला*
*''महाराज थोडे दही मागवाल का?''महाराजांनी दही मागवले. मग प्रधान पुत्र म्हणाला ''महाराज! यात लोणी दिसतो का? "महाराज म्हणाले "लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल" प्रधानपुत्र म्हणाला "महाराज देवाचेही असेच आहे. त्यासाठी मंथन- साधना-तपश्चर्या करावीच लागेल,*
*मंथुनी नवनीता।*
*तैसे घे अनंता।।*
*"महाराज खुश झाले व म्हणाले "आता अंतिम प्रश्न, ईश्वर काय करतो?"*
*प्रधानपुत्र म्हणाला महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल'' महाराज बोलले - ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य'' पुत्र म्हणाला - ''महाराज गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य खाली बसतो" महाराजांनी सिंहासन खाली केले व स्वतः खाली बसले. प्रधानपुत्र स्वतः सिंहासनावर् बसला व म्हणाला "हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे" महाराज म्हणाले "म्हणजे काय? मी समजलो नाही".*
*बालक म्हणाला- ''महाराज ! ईश्वर हेच तर करतो, त्याने ठरविले तर तो क्षणात राजाचा रंक व रंकाचा राव करतो.*
*तुका म्हणे नोहे*
*काय त्या करिता!*
*चिंतावा तो आता विश्वांभर!*
🚩 *श्रीगुरूदेव*🚩
शुभ प्रभात 🌷
~~~~~~~~~~~~~~
या पोस्टला उत्तर
1. ईश्वर जर सर्वत्र आहे तर मग त्याला निर्भया वरील बलात्कार, कुपोषित निष्पाप बालके, कॅन्सर व तत्सम रोगाच्या यातना भोगणारे रोगी, चोर, भामटे, खुनी, ISIS अतिरेकी हे दिसत नाहीत काय? दिसत असेल तर तो काहीच का करीत नाही. तो सर्वत्र असता तर त्याने नक्कीच हस्तक्षेप केला असता. आपले अस्तित्व जाणवून दिले असते. तात्पर्य तो सर्वत्र काय, कुठेच नाही असा निष्कर्ष काढावा लागतो.
2. ईश्वर, मंथन म्हणजे जपतप केल्याने मिळतो असे म्हणता! ईश्वर मिळतो म्हणजे नक्की काय मिळते? तो सर्वत्र असेल तर मंथन केल्यावर त्यातला नक्की कोणता भाग मिळतो. त्याचा नक्की आकार काशासारखा असतो? तो निर्गुण निराकार असेल तर मंथन केल्याने जे काही तथाकथित निर्गुण निराकार मिळत असेल ते म्हणजे चक्क बाबाजीचा ठुल्लूच असणार, नाही का?
३. ईश्वर, राजाला रंक किंवा रंकाला राजा बनवतो हि बनवाबनवी आहे. जो कोणी काही बनतो तो कर्मामुळे व परिस्थितीमुळे बनतो. जो निर्भयावरील पाशवी अत्याचार थांबवू शकत नाही, निष्पाप बालके कुपोषणाने मारतात ते थांबवू शकत नाही, आतंकवाद्यांद्वारा घेतले जाणारे बळी थांबवू शकत नाही, रोगराई, विषमता, गरीबी दूर करू शकत नाही तो कसला कुणाला राजा बनवणार आणि कसला कुणाला रंक बनवणार?
लहान मुलांकडून सुद्धा उल्लू बनणारे असले बिनडोक राजे व तसलेच रिकामटेकडे लोक जिथे असतात तिथेच असले प्रश्न सुचतात व असली शेंडा बुडका नसलेली उत्तरे खपवून घेतली जातात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा