पोस्ट्स

अंग्रेजों ने हमारे वेदों से विज्ञान चोरी किया यह दावा, काकतालीय न्याय का योग्य उदाहरण

 यदि हमारे पूर्वजों को हवाई जहाज बनाना नहीं आता, तो हमारे पास "विमान" शब्द भी नहीं होता.! यदि हमारे पूर्वजों को Electricity की जानकारी नहीं थी, तो हमारे पास "विद्युत" शब्द भी नहीं होता।  यदि "Telephone" जैसी तकनीक प्राचीन भारत में नहीं थी तो, "दूरसंचार" शब्द हमारे पास क्यों है ? Atom और electron की जानकारी नहीं थी तो अणु और परमाणू शब्द कहाँ से आये?  Surgery का ज्ञान नहीं था तो, "शल्य चिकितसा" शब्द कहाँ ये आया? विमान,  विद्युत, दूरसंचार, ये शब्द स्पष्ट प्रमाण है, कि ये तकनीक भी हमारे पास थी।  बिना परिभाषा के कोई शब्द अस्तित्व में रह नहीं सकता।  सौरमण्डल में नौ ग्रह है व सभी सूर्य की परिक्रमा लगा रहे है, व बह्ममाण्ड अनन्त है, ये हमारे पूर्वजों को बहुत पहले से पता था। रामचरित्र मानस में काक भुशुंडि - गरुड संवाद पढ़िये, बह्ममाण्ड का ऐसा वर्णन है, जो आज के विज्ञान को भी नहीं पता। अंग्रेज़ जब 17-18 सदी में भारत आये तभी उन्होंने विज्ञान सीखा,  17 सदी के पहले का आपको कोई साइंटिस्ट नहीं मिलेगा।  17 -18 सदी के पहले कोई  आविष्कार यूरोप में नहीं हु...

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

इमेज
     सध्या सोशल मीडियावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना आरशाची काच कशी आपोआप फुटते याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करताना मूर्तीच्या समोर एक व्यक्ती आरसा धरून उभी असते. मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढली की समोरच्या आरशाची काच आपोआप फुटते. त्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की ही काच मूर्तीमध्ये असलेल्या शक्तीमुळे फुटली आहे.  हा चमत्कार म्हणजे हातचलाखी आहे. मूर्तीसमोर धरलेला आरसा प्लॅस्टिकच्या फ्रेमचा आहे. मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढली की आरशाच्या पाठीमागून अंगठ्याने जोरात दाब दिला जातो आणि त्यामुळे आरशाची काच फुटते. हा चमत्कार कुणीही करू शकतो. प्लॅस्टिकच्या फ्रेमचा आरसा वापरण्याऐवजी लाकडी फ्रेम असणारा आरसा वापरून कुणीही हा चमत्कार करून दाखवावा. त्यांना तो करता येणार नाही. कारण काचेच्या पाठीमागे जाड लाकडी आवरण असल्याने अंगठ्याने कितीही दाब दिला तरी काच फुटणार नाही  कुठल्याही मंत्रामध्ये कसलीही ताकद नसते. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हटल्याने कुठल्याही मूर्तीमध्ये प्राण येत नसतो, हे वास्तव आहे. परंतु लो...
 🔴🔴🔴 *(३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर "अरे_कुठायत_ते ?" हा मेसेज व्हायरल होत आहे या मेसेजला "चला उत्तर देऊया" टीमने दिलेले उत्तर)* (व्हायरल होत असलेला मेसेज) 👇🏼👇🏼👇🏼 #अरे_कुठायत_ते? रात्री १० नंतर फटाके वाजवायचे नाही असा #आदेश (?) असूनही ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता फटाके वाजवून देणारे #पर्यावरणपुळके कुठेयत? कुठेयत त्या #शाळा त्या #समाजसेवी_संस्था, ती शाळेतली लहान असमंजस कोवळी मुले? शाळेतील लहान मुलांना #फटाके विरहित दिवाळी साजरी करायच्या शपथा देणारे #शपथवीर कुठेयत? शाळेतील लहान मुलांना #आवाजमुक्त दिवाळी साजरी करायच्या शपथा देणारे #शपथसुंभ कुठेयत? फटाका विरहित, आवाज विरहित, प्रदूषण विरहित ३१ डिसेंबर साजरा करण्याचा शपथा या लहान मुलांना शाळेशाळेत जाऊन देणार का?  कुठेयत ते मराठी, हिंदी चित्रपट आणि सिरीयल मध्ये काम करणारे #पर्यावरणरक्षक  #कलाकार? अहो ३१ डिसेंबर जवळ येत चाललाय.. अरे कुठे आहात तुम्ही? असे गप्प का? पर्यावरण,प्रदूषण, ध्वनी प्रदूषण तुमची #डोळ्यात_प्राण आणून वाट पाहत आहे.     *या मेसेजला "चला उत्तर देऊया" टीमने दिलेले उत्तर..* 👇...

पहिल्या शिक्षिका कोण?

इमेज
  पुढील अर्थाची एक पोस्ट प्रसारित होत आहे:  *‘भारताला स्त्री शिक्षणाची प्राचीन परंपरा आहे’,*  *‘गंगाबाई पहिल्या शिक्षिका’*   ‘अमेरिकन मराठी मिशन’च्या १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या १८१३ ते १८८१च्या रिपोर्टचा संदर्भ देऊन या पोस्टमध्ये दावा केला आहे की, इंग्रज राजवटीत अनेक शिक्षिका कार्यरत होत्या.  गंगाबाई या इ.स. १८२४ दरम्यान मुलींची शाळा चालवत होत्या. गंगाबाई या मुंबईच्या मूळ रहिवासी होत्या. आगरी कोळी हे मुंबईचे मूळ रहिवासी होत. Native=मूळ रहिवासी, भूमिपुत्र. (म्हणून गंगाबाई या आगरी कोळी होत्या आणि त्या पहिल्या शिक्षिका होत्या असे म्हणायचे असावे!)  अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे काय, संदर्भ सोडून (out of context) कसे लिहावे याचे  वरील पोस्ट हे उदाहरण आहे. तसेच महात्मा फुले आणि सवित्रिमाई फुले यांच्यावरील राग, द्वेष, तिरस्कार  दर्शविण्यासाठी आणि त्यांचे कर्तृत्व कमी लेखण्यासाठी आगरी -कोळी समाजाचे  कार्ड वापरुन  हिंदुत्ववादी जाणीवपूर्वक  किती खालच्या थराला जाऊ शकतात, किती केविलवाणा प्रयत्न करू शकतात  याचेही वरील पोस्ट हे उ...

ऋषी सुनक यांनी दिवाळी साजरी केली पण...

इमेज
      ज्या देशाने १५०वर्षे हिंदुस्थानावर राज्य केले. त्याच देशाचा पंतप्रधान आज हिंदू आहे. व हिंदू सणाचा आनंद पतंप्रधान निवासात साजरा करत आहेत.              *हिंदू धर्माची ताकद  आज  जगाला दिसत आहे .यापेक्षा दीपावलीचा आनंद असू शकत नाही.*     तिकडे धर्म-आचरणाचे मुक्त स्वातंत्र्य असल्याने आणि अन्य अल्पसंख्यक धर्मांचा आदर केला जात असल्याने हे शक्य होत आहे. ख्रिस्ती बहुमतात आहेत म्हणून तिथल्या ख्रिस्ती लोकांवर ख्रिस्ती धर्माची जबरदस्ती केली जात नाही. "जय श्रीराम" बोल नाही तर मार खा, असा प्रकार तिकडे नाही.     बसता उठता इथे जसे अल्पसंख्यक धर्मीयांविरुद्ध गरळ ओकले जाते तसे तिथे नाही. म्हणून तिथे हिंदू असल्पसंख्यक व्यक्ति प्रधान मंत्री बनू शकते. मुसलमान देखील बनू शकेल.  आता तिथे हिंदू पंतप्रधान म्हणून 10 डाउनिंग स्ट्रीट या अधिकृत निवासात दिवाळी साजरी केली जात असेल आणि त्यासाठी इथले तथाकथित हिंदू हुरळून जात असतील तर त्यांनी पुढील व्हीडीओ पहावा. यामध्ये हे हिंदू पंतप्रधान चक्क ख्रिसमस ट्रीची लाइट पेटवून ख्रिस...

Uniform Civil Code समान नागरी कायदा

मूळ पोस्ट  #UniformCivilCode  समजून घेऊया... समजा एका हिं*दू 40 वर्षीय इसमाने 10 वर्षांच्या बालिकेशी विवाह केला तर तो बालविवाह कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र आहे, कारण ??- हिंदू कोड बिल, हिंदू विवाह कायदा = संविधान . पण,... समजा एका मु$लीम 40 वर्षीय इसमाने 10 वर्षांच्या बालिकेशी विवाह केला तर तो बालविवाह कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र नाही,कारण ?? मु$लीम लॉ बोर्ड,शरीया कायदा ? = No संविधान एकाच गुन्ह्यासाठी, एकाच सेक्युलर देशात दोन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ?? एकाच सेक्युलर देशात एकाच वेळी एक जण संविधान पाळणार आणि दुसरा पाळणार नाही ? ऐसा कैसे चलेगा मियां? हिंदू बालिकेसाठी जो अन्याय आहे तो मु$सलमान बालिकेसाठीपण अन्यायच असला पाहिजे ना ? इथे येतो UCC Uniform Civil Code सगळ्यांना समान कायदा,समान नियम म्हणजेच #UCC #शिवानी गोखले ======== या पोस्टला उत्तर #UniformCivilCode  UCC जरूर हवा पण अफवा आणि दिशाभूल यापासून दूर रहा: उदा. शिवानी गोखले यांची पोस्ट  १) उदाहरण देतांना १० वर्षे असे मुस्लिम मुलीचे वय गृहीत धरून ते लग्न शरियानुसार योग्य गृहीत धरले आहे. हे चूक आहे. शरियानुसार आणि...

ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता(?)

 📖 *ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता(?)* 📖 (^m^) (^j^) (मनोगते) सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीने 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.विज्ञान युगाचा अभिमान धरणार्या मंडळींना ज्ञानेश्वरीने विज्ञानावर कशी मात केली आहे हे त्यातील काही ओव्यांवरून लक्षात येईल.अलीकडच्या काही शतकांमध्ये जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्यांचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते. _ही सगळी विधाने दिशाभूल करणारी असून त्यातून अंधभक्तांचे अर्धवट ज्ञानच दिसते. सर्वात पहिली गोष्ट कुठल्याही ओव्याचें संदर्भ क्रमांक दिलेले नाहीत. त्यामुळे त्या ओव्यांबद्दल साशंकतेला वाव राहातो. दुसरे म्हणजे ओव्यांचा अर्थ आपल्याला हवा तसा तोडून मोडून लावलेला दिसतो._ म्हणून खाली अंधभक्तांनी दिलेली मूळ ओवी आणि त्याचा त्यांनी लावलेला अर्थ देऊन नंतर त्याचे आम्ही योग्य स्पष्टीकरण  देत आहोत. 1) "उदय-अस्ताचे प्रमाणे, जैसे न चालता सूर्...