पोस्ट्स

मंदिरांनी पैसा दिला पण दवाखान्यांनी लुटले...

मंदिरांनी पैसा दिला पण दवाखान्यांनी लुटले – *कौस्तुभ शेजवलकर* यांनी संवाद रुपात खालील उत्तर लिहिले आहे. ते जेवढे वाचनीय आहे तेवढेच मनानीयही आहे... मूळ Post: मंदिरांना दान करण्यापेक्षा दवाखान्यांना करा हे सांगणारे हे विसरतात कि संकटात मंदिरांनीच पैसा दिला दवाखान्यांनी मात्र लुटला! ➖➖➖➖➖➖ मी: असं म्हणणारे हे विसरतात की, जीव दवाखान्यांनी वाचवला मंदिरांनी नाही. ➖➖➖➖➖➖ तो: खरं आहे...  जीव दवाखान्यांनी वाचवला पण पैसे घेऊनच ना? ते पण अनेकांच्या आवाक्याबाहेरची बिले वसूल करूनच ना? म्हणजे शुद्ध लाभासाठी ना? अनेकदा मृतदेहाचा ताबा पैसे वसूल केल्याशिवाय न देताच ना?  आमचे म्हणणे दवाखाने नकोच असे नाहीये, तर त्या साठी देवस्थानांची अपकीर्ति नको इतकेच आहे. मंदिरात मात्र जाताना आणि परत येताना कोणत्याही प्रकारच्या बिलाची जबरदस्ती तर नसते ना???  Advance पण भरावा लागत नाही.  शिवाय ज्यांची श्रध्दा मंदिराच्यापेक्षा दवाखान्यांवर आहे त्यांनी नक्कीच मंदीरात न जाता दवाखान्यात जावे आणि शक्य असेल तितके किंबहुना क्षमतेच्या पेक्षा अधिक पैसे दवाखान्यात द्यावेत काहीच हरकत नाही.  _मंदिरात मात्र ज...

“होय निर्भीडच” या शीर्षकाची व ‘खरी अंधश्रद्धा कोणती?’

“होय निर्भीडच” या शीर्षकाची व ‘खरी अंधश्रद्धा कोणती?’ असा प्रश्न करून, अंधश्रद्धेची नवीन बिनडोक व्याख्या करणारी एक पोस्ट समाज-माध्यमांमध्ये फिरते आहे त्यास हे उत्तर... – उत्तम जोगदंड ।। होय बिनडोकच।।  दगडाला देव मानून जो पूजतो त्याने फुले, शाहू, आंबेडकर, तुकाराम यांना ओढून ताणून वेठीस धरणे हाच मुळात असमंजसपणा आहे. तुकारामांनी तर “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखवा, देव तेथेची जाणावा।“ असे सांगून दगडाचा देवच नाकारलेला आहे. तीर्थी धोंडा पाणी | देवरोकडा सज्जनी| असेही तुकोबा म्हणतात.  फुले, शाहू, आंबेडकर हे तर त्या ही पुढे गेलेले आहेत. दगडाची पुजा करायचा लेखकला अधिकार असू शकतो. परंतु त्यासाठी दगडाच्या देवाला नाकारणार्‍यांचे अशा प्रकारे नाव घेण्याचा लेखकाला काहीही अधिकार नाही. माझ्या घामाचे पैसे दानपेटीत टाकतो हे वाक्य केवळ माज व उर्मटपणा दर्शविते. आपल्या घामाचे पैसे दानपेटीत टाकावेत, दारू/डान्स बार वर उधळावेत, जाळून टाकावेत कि सत्कारणी लावावेत हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीचा प्रश्न आहे. त्या बद्दल प्रश्नच नाही. तरीही, असे पैसे, किंवा देवावर ओतले जाणारे...

कोरोना काळात अंनिसने काय काय केले?

 'देव देवळात नसून माणसांत आहे, हे वाक्य हजारदा ऐकवणारी "अंनिस" म्हणजे अंधश्रध्दा निर्मूलन समिती या संकटकाळात कोणाला दिसली आहे का? – Shri Mahant Sudhirdas  या धर्मांधांने लिहिलेली वरील पोस्ट व्हायरल होत आहे; आणि 'अंनिस'द्वेष्टे ती फॉरवर्ड करत आहेत. त्या सगळ्यांसाठी 'अंनिस'तर्फे खालील उत्तर दिले आहे. तेव्हा आपल्याच कोशात मग्न असणाऱ्या दीड दमडीच्या धर्मांधांनो, आपले हुच्च संस्कार दाखवून का उगाच हसे करून घेत आहात? करोनाच्या संकट काळात 'अंनिस'ने खालील प्रमाणे कामे केली आहेत...  हे वाचा आणि आपले थोबाड काळे करा... 1)अंनिसने कोरोनाबाधीत व त्याच्या कुटुंबातील लोकांना मदत म्हणून मानसमित्र आधार देणारी टीम उभी केली. 2)काही ठिकाणी प्रत्यक्ष रुग्णसेवेत अंनिसचे तज्ञ असलेले कार्यकर्तेही कोरोना काळात काम करत आहेत. ३)अंनिसचे शिक्षक सरकारी कर्मचारी प्रशासनाबरोबर काम करत आहेत. ३)वरीष्ठ नागरिकाना औषधे, किराणा माल, दैनदिन वस्तू पुरवायचे काम रत्नागिरी व इतर ठिकाणीही चालू आहे. ४)नगरसारख्या ठिकाणी तर आपण मोबाईल व्हेइकलद्वारे परिसर निर्जुतुकिकरण करण्याचे काम करत आहोत. ५)कोव...
 *हिंदु धर्माची निंदा करणारे लोक, हिंदु धर्मात 33 कोटि देव म्हणुन मजा उडवतात। त्या बद्दल स्पष्टीकरण*👇 *प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?* उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो  पण ,  येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे.   मुळात संस्कृतमधील  "कोटि"  या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार'  असा आहे.  ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत.  त्यांच्यात ,  ८ वसू,  ११ रूद्र,  १२ आदीत्य,  १ इंद्र १ प्रजापती  असे पाच स्तर आहेत . प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे. अष्टवसूंची नावे -  आप, धृव, सोम, धर, अनिल,  अनल, प्रत्यूष आणि प्रभास .  अकरा रूद्रांची नावे -  मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज. बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू १ इंद्र आणि १ प्रजापती असे...

क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं?

 क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं? हाँ १००% सच है!! भारत का रेडियो एक्टिविटी मैप उठा लें, हैरान हो जायेंगे! भारत सरकार के न्युक्लियर रिएक्टर के अलावा सभी ज्योतिर्लिंगों के स्थानों पर सबसे ज्यादा रेडिएशन पाया जाता है। ▪️ शिवलिंग और कुछ नहीं बल्कि न्युक्लियर रिएक्टर्स ही तो हैं, तभी तो उन पर जल चढ़ाया जाता है, ताकि वो शांत रहें। ▪️ महादेव के सभी प्रिय पदार्थ जैसे कि बिल्व पत्र, आकमद, धतूरा, गुड़हल आदि सभी न्युक्लिअर एनर्जी सोखने वाले हैं। ▪️ क्यूंकि शिवलिंग पर चढ़ा पानी भी रिएक्टिव हो जाता है इसीलिए तो जल निकासी नलिका को लांघा नहीं जाता। ▪️ भाभा एटॉमिक रिएक्टर का डिज़ाइन भी शिवलिंग की तरह ही है।[1] ▪️ शिवलिंग पर चढ़ाया हुआ जल नदी के बहते हुए जल के साथ मिलकर औषधि का रूप ले लेता है। ▪️ तभी तो हमारे पूर्वज हम लोगों से कहते थे कि महादेव शिवशंकर अगर नाराज हो जाएंगे तो प्रलय आ जाएगी। ▪️ ध्यान दें कि हमारी परम्पराओं के पीछे कितना गहन विज्ञान छिपा हुआ है। ▪️ जिस संस्कृति की कोख से हमने जन्म लिया है, वो तो चिर सनातन है। विज्ञान को परम्पराओं का जामा इसलिए पहनाया गया है ताकि वो प्रचलन बन जाए और ह...

‘मारुतीस्त्रोत्र’च्या खर्‍या अर्थाची थापेबाजी

 ‘मारुतीस्त्रोत्र’च्या खर्‍या अर्थाची थापेबाजी.    ‘मारुतीस्तोत्र खरा अर्थ’ या शीर्षकाची एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. स्टीफन हॉकिंग यांचे नाव व ‘सिम्युलेरीटी थेरम’, Advance Psychology  आणि ‘थर्मोडायनॅमिक्स ऑफ ब्लॅकहोल्स’ असे वैज्ञानिक शब्द वापरुन मारुतीस्तोत्र हे संत रामदासांनी अणुशक्तीचे केलेले वर्णन आहे असे सांगायचा केविलवाणा प्रयत्न त्या पोस्ट-लेखकाने केला आहे. या पूर्वी शिवथरघळ बाबतीत सुद्धा अशीच अवैज्ञानिक पोस्ट कोणीतरी पसरवली होती ती पुराव्यांसह खोडून काढली गेली होती.   आता मारुतीस्तोत्र पाहू या. या स्तोत्राचा संपूर्ण अर्थ पुढील लिंक मध्ये उपलब्ध आहे. हे स्तोत्र मारुती या देवाचे वर्णन व गुणगान करणारे आहे. ( स्तोत्रं म्हणजे स्तुती) मारुती किती शक्तीशाली आहे वगैरे माहिती यात आहे.  https://www.marathisrushti.com/articles/the-marathi-meaning-of-maruti-stotra/ यात कुठेही अणुशक्तीशी संबंधित असा अर्थ कल्पनेला कितीही ताण दिला तरी निघत नाही. खरे तर या स्तोत्रातील एकूण एक कल्पना हा कल्पनाविलासाचा नमूना आहे. कोणाला तो श्रद्धेचा भाग मानायचा असेल तर ठीक आ...

हिमालयीन फसवणूक

*पहाटे 3 वाजता हिमालयामधील सूर्योदय त्यात इडा पिंगला सुषमा नाडीबरोबर मुलाधारासह अर्धचंद्रमाचे रुप दिसते त्याला शंकराचे विश्व्ररुप ही म्हणतात* अशा शीर्षकाखाली एक व्हीडीओ क्लिप हल्ली व्हाट्सअॅप 'बाजारात' आलेली दिसते. यामध्ये सूर्योदय किंवा सूर्यास्त समयीचे एक सुंदर दृश्य चित्रित केले आहे. त्यात मध्यभागी सूर्य, सूर्याच्या भोवती प्रकाशमान अर्धवर्तुळ, त्या अर्धवर्तुळाच्या वरील टोकाला अजून एक सूर्य तसेच क्षितिजावरील दोन बाजूंना दोन सूर्य असल्याचा भास होतो आहे.  अशा आयत्याच लाभलेल्या सुंदर दृश्याच्या व्हीडीओमध्ये लेगेच आपला 'देव', घुसवण्यात भारतीय मागे कसे राहतील? त्यात त्यांना इडा, पिंगला, सुषमा नदी, मूलाधार, अर्धचंद्र आणि शेवटी शंकराचे विश्वरूप दिसू लागले. आता याचे विश्लेषण करू या:  १) सदर व्हीडीओ हा "हिमालयातील" पहाटे तीन वाजताचा आहे असा दावा केला आहे. परंतु हा व्हीडीओ हिमालयातील नसून स्वीडन या देशातील आहे. याची लिंक पुढील प्रमाणे ( https://www.youtube.com/watch?v=bjiq_8K_k8Q ). या १५.०४.२०१९च्या व्हीडीओखाली तो टाकणार्‍याने वर्णन देखील लिहले आहे ते असे: A sun dog ...