कोरोना काळात अंनिसने काय काय केले?

 'देव देवळात नसून माणसांत आहे, हे वाक्य हजारदा ऐकवणारी "अंनिस" म्हणजे अंधश्रध्दा निर्मूलन समिती या संकटकाळात कोणाला दिसली आहे का? – Shri Mahant Sudhirdas 


या धर्मांधांने लिहिलेली वरील पोस्ट व्हायरल होत आहे; आणि 'अंनिस'द्वेष्टे ती फॉरवर्ड करत आहेत. त्या सगळ्यांसाठी 'अंनिस'तर्फे खालील उत्तर दिले आहे. तेव्हा आपल्याच कोशात मग्न असणाऱ्या दीड दमडीच्या धर्मांधांनो, आपले हुच्च संस्कार दाखवून का उगाच हसे करून घेत आहात?

करोनाच्या संकट काळात 'अंनिस'ने खालील प्रमाणे कामे केली आहेत... 

हे वाचा आणि आपले थोबाड काळे करा...

1)अंनिसने कोरोनाबाधीत व त्याच्या कुटुंबातील लोकांना मदत म्हणून मानसमित्र आधार देणारी टीम उभी केली.

2)काही ठिकाणी प्रत्यक्ष रुग्णसेवेत अंनिसचे तज्ञ असलेले कार्यकर्तेही कोरोना काळात काम करत आहेत.

३)अंनिसचे शिक्षक सरकारी कर्मचारी प्रशासनाबरोबर काम करत आहेत.

३)वरीष्ठ नागरिकाना औषधे, किराणा माल, दैनदिन वस्तू पुरवायचे काम रत्नागिरी व इतर ठिकाणीही चालू आहे.

४)नगरसारख्या ठिकाणी तर आपण मोबाईल व्हेइकलद्वारे परिसर निर्जुतुकिकरण करण्याचे काम करत आहोत.

५)कोविड काळात आपण मुख्यमंत्री फंडाला मदत तर केलीच पण काही कार्यकर्त्यांनी त्या फंडासाठी पैसेही गोळा करून दिले आहेत.

६)काही ठिकाणी संबधीताना थेट आर्थिक, धान्यरुपाने मदत केलेली आहे.

.७)जनजागृती विवेक जागर म्हणून डाँ.संग्राम पाटील याचे आँनलाईन वेबिनार कोविड संदर्भात घेतले आहेत.

८)कोविड संदर्भात सर्व माहीती विवेक जागर तर्फे कोविड जागर विशेषांक प्रसारीत केली आहे.

९)कोविडमुळे सामाजिक अंतर ठेवा हा चुकीचा संदेश देणारा शब्द बदला व शारीरिक अंतर ठेवा हा शब्द वापरा म्हणून शासनाला विनंती केली होती ते मान्य झाले.

१०)आरोग्य सेवक, डाँक्टर, नर्स व इतरावर काही ठिकाणी सोसायटीमध्ये येण्यास बंदी घातली होती. अशा आरोग्य सेवकाना मदत केली. काही ठिकाणी सामाजिक बहिष्कार घालणारे होते, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याने कारवाई करायला पोलिसाना भाग पाडले.

११)कोरोना मंतरलेल्या पाण्याने व रुमालाने बरा होणार असा दावा करणाऱ्या फादर दापोडी पुणे याविरोधात पोलिसाकडे तक्रार करून त्याला अटक करवली.

१२)कोरोना ताईत बांधुन बरा होणार आसा मुस्लिम बाबाने दावा केला त्याविरोधात तक्रार केली त्याचा परदाफार्षं केला.

१३)शेण, गोमुत्र याने कोरोना बरा होतो असे चुकीचे दावे करणारे होते त्याविरोधात आवाज उठविला.


अशी बरीच कामे अंनिसने केली आहेत. या पार्श्वभूमीवर धर्मांधांनो, तुम्ही काय केले? कोरोना काळात देवळे बंद झाली. पुजारी, महंत भीतीने गप्प गुमानपणे मुकाट घरात बसले. कारण त्याना देव आध्यात्म वाचवू शकणार नव्हते. विज्ञानाच्या मदतीनेच ते जगले आहेत. स्वतः कुठलेही सामाजिक काम न करता... लोकांना मदतीचा हात न देता सुरक्षित बिळात लपणाऱ्या धर्मांधांनो एवढी जाणीव ठेवा की, शेवटी विज्ञानच तुमच्या मदतीला आले देव आणि धर्म नाही.

टिप्पण्या

  1. Link/ फोटो आहेत का, टाका भक्तांच्या तोंडावर5फेकून मारायच्या आहेत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. फेसबुकवर मिळतील.
      दुसरी गोष्ट अंनिस कार्यकर्त्यांना खोटे बोलायची सवय नाही.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?