पहिल्या शिक्षिका कोण?
पुढील अर्थाची एक पोस्ट प्रसारित होत आहे: *‘भारताला स्त्री शिक्षणाची प्राचीन परंपरा आहे’,* *‘गंगाबाई पहिल्या शिक्षिका’* ‘अमेरिकन मराठी मिशन’च्या १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या १८१३ ते १८८१च्या रिपोर्टचा संदर्भ देऊन या पोस्टमध्ये दावा केला आहे की, इंग्रज राजवटीत अनेक शिक्षिका कार्यरत होत्या. गंगाबाई या इ.स. १८२४ दरम्यान मुलींची शाळा चालवत होत्या. गंगाबाई या मुंबईच्या मूळ रहिवासी होत्या. आगरी कोळी हे मुंबईचे मूळ रहिवासी होत. Native=मूळ रहिवासी, भूमिपुत्र. (म्हणून गंगाबाई या आगरी कोळी होत्या आणि त्या पहिल्या शिक्षिका होत्या असे म्हणायचे असावे!) अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे काय, संदर्भ सोडून (out of context) कसे लिहावे याचे वरील पोस्ट हे उदाहरण आहे. तसेच महात्मा फुले आणि सवित्रिमाई फुले यांच्यावरील राग, द्वेष, तिरस्कार दर्शविण्यासाठी आणि त्यांचे कर्तृत्व कमी लेखण्यासाठी आगरी -कोळी समाजाचे कार्ड वापरुन हिंदुत्ववादी जाणीवपूर्वक किती खालच्या थराला जाऊ शकतात, किती केविलवाणा प्रयत्न करू शकतात याचेही वरील पोस्ट हे उ...