गणेशोत्सवाची बदनामी थांबवा ! - नित्यानंद भिसे मागील १-२ दशकांपासून गणेश मूर्तींमुळे जलप्रदूषण होते, असा गैरसमज समाजमनावर बिंबवण्यात आला आहे. यासाठी गोबेल्स नीतीचा शिताफीने वापर करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या आधी तीन-चार महिने काही लोक अचानकपणे गणेश मूर्तीच्या प्रदूषणाचा विषय चर्चेत आणतात. त्यानंतर या उत्सवावर टीकाटिप्पणी सुरू करतात. वाद-विवाद होतात, त्यातून उत्सवाची बदनामी सुरू होते. दरवर्षी गणेशोत्सवात हे नित्याचे बनले आहे. वास्तविक कोणत्याही प्रकारे जलप्रदूषण होत असेल, तर त्याला आळा घालणे आवश्यक आहे, परंतु त्याआधी ज्या कारणामुळे जलप्रदूषण होत असल्याचा दावा केला जात आहे, त्या कारणांची विज्ञानाच्या कसोटीवर पडताळणी होणे गरजेचे आहे. तेव्हाच योग्य काय आणि अयोग्य काय, हे उमजेल, त्याचा अभ्यास करून शासकीय पातळीवर धोरण ठरवणे आवश्यक आहे.असे झाले, तरच या उत्सवाची बिनबोभाटपणे होत असलेली बदनामी थांबेल. गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होते, असा दावा सर्वातआधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला, त्यानंतर या समितीने गणेश मूर्तीद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ...