महालक्ष्मी कॅलेंडर मधील भाकीत
घरात महालक्ष्मी कॅलेंडर असेल तर जुलै 2021 महिन्याचं पान उघडा, उजव्या हाताला 'पर्जन्य अंदाज' चा रकाना बघा. 8-9 महिन्यांपूर्वी सूर्याची स्थिती 22 जुलैला कोणत्या नक्षत्रात असेल, त्यावरून त्यांनी पावसाचा अंदाज लावला आहे. त्यात भरीस भर म्हणजे पूर येणार हे भाकीतही केलं आहे. त्यानुसार 22 जुलैला झालेल्या पावसामुळे कोकणात बहुतेक सर्वच ठिकाणी पूर आलेला आहे. आता महत्वाचा मुद्दा, काही पुढारलेली लोकं, ज्यांचं मस्तिष्क अभिनव शैक्षणिक पद्धतीने तासून घेतलेलं आहे असे वास्तववादी लोक या हिंदू ज्योतिष शास्त्राला आणि पंचांगाला थोतांड म्हणून हिणवतात आणि हे पंचाग बघणाऱ्या विशारदांना किडमिडे गुरुजी म्हणून टोपण नावे ठेवतात. मला अशा सो-कॉल्ड सुधारलेल्या लोकांना एवढंच सांगावस वाटत की ब्रिटिशांच्या मार्गदर्शनाच्या आणि शिक्षणपद्धतीचा कुबड्या घेऊन तुम्हाला वाटत असेल की तुमचा सर्वांगीण विकास झाला आहे तर खरं म्हणजे ते तुमचं वैचारिक अध:पतन आहे. हिंदू संस्कृती ही विश्वगुरु होती आणि भविष्यातही राहील, कुणी परकीय शक्तीने तिच्या बद्दल कितीही वाईट गोष्टींचा प्रचार केला तरी तिचे सत्व तुसभरही कमी होणार नाही. ...