मंदिरांनी पैसा दिला पण दवाखान्यांनी लुटले...
मंदिरांनी पैसा दिला पण दवाखान्यांनी लुटले – *कौस्तुभ शेजवलकर* यांनी संवाद रुपात खालील उत्तर लिहिले आहे. ते जेवढे वाचनीय आहे तेवढेच मनानीयही आहे... मूळ Post: मंदिरांना दान करण्यापेक्षा दवाखान्यांना करा हे सांगणारे हे विसरतात कि संकटात मंदिरांनीच पैसा दिला दवाखान्यांनी मात्र लुटला! ➖➖➖➖➖➖ मी: असं म्हणणारे हे विसरतात की, जीव दवाखान्यांनी वाचवला मंदिरांनी नाही. ➖➖➖➖➖➖ तो: खरं आहे... जीव दवाखान्यांनी वाचवला पण पैसे घेऊनच ना? ते पण अनेकांच्या आवाक्याबाहेरची बिले वसूल करूनच ना? म्हणजे शुद्ध लाभासाठी ना? अनेकदा मृतदेहाचा ताबा पैसे वसूल केल्याशिवाय न देताच ना? आमचे म्हणणे दवाखाने नकोच असे नाहीये, तर त्या साठी देवस्थानांची अपकीर्ति नको इतकेच आहे. मंदिरात मात्र जाताना आणि परत येताना कोणत्याही प्रकारच्या बिलाची जबरदस्ती तर नसते ना??? Advance पण भरावा लागत नाही. शिवाय ज्यांची श्रध्दा मंदिराच्यापेक्षा दवाखान्यांवर आहे त्यांनी नक्कीच मंदीरात न जाता दवाखान्यात जावे आणि शक्य असेल तितके किंबहुना क्षमतेच्या पेक्षा अधिक पैसे दवाखान्यात द्यावेत काहीच हरकत नाही. _मंदिरात मात्र ज...