तथाकथित संतांचे प्रकटीकरण
तथाकथित संतांचे प्रकटीकरण - डॉ प्रकाश कोयाडे 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असं म्हणण्यापाठीमागचा अर्थ हाच की, 'तु भित्रा आहेस!' ही पोस्ट वाचून एखाद्याच्या भावना दुखावत असतील तर दुखू देत, पायताणाशेजारी मेंदु ठेवून मंदिरात प्रवेशनाऱ्या लोकांसाठीच ही पोस्ट आहे. एकीकडे देश महासत्ता होणार अशी स्वप्न पहायची आणि दुसरीकडे साईबाबाचा जन्म कुठे झाला अशा वांझोट्या प्रश्नावर वाद घालायचा हे भारताशिवाय कुठेच होत नसेल. हे बाबालोक प्रकट कुठे झाले, कधी झाले, कसे झाले यापेक्षा ते प्रकट 'का' झाले... हा सर्वात मोठा प्रश्न आहे. संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज या चारशे पाचशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या संतमंडळींच्या जन्मतारखा किंवा जन्मवर्ष तरी उपलब्ध आहेच. एवढंच नाही तर तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांच्या जन्ममृत्युबद्दल, त्यांचे आई-वडील,गाव, कुळ सर्व माहिती उपलब्ध आहे. मग हे दीडशे वर्षांपूर्वी अगदी इंग्रज असताना उपजलेल्या (प्रकटलेल्या) बाबा लोकांचं मुळ का सापडू नये? स्वामी समर्थ, साईबाबा आणि गजानन महाराज... या तिघांचा इतिहास जवळपास सारखाच आहे. विना घडविता 'माठ...