सगुण-निर्गुणामागील छद्म विज्ञान
सगुण-निर्गुणामागील छद्म विज्ञान - जेट जगदीश. (^j^) राजेंद्र वैशंपायन नावाचा ज्ञानोबांचा श्रद्धाळू भक्त एकदा मला म्हणाला, 'ज्ञानदेवांच्या खालील ओवीवर मी एक कथा लिहिली आहे, त्यावरून हे सिद्ध होते की, ज्ञानोबा हे किती महान वैज्ञानिक होते! एक ती कथा'....... 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे अनुमाने ना अनुमाने ना श्रुती नेती म्हणती गोविंदू रे'... ही ओवी माधवराव आजोबा गुणगुणत होते. ते ऐकून त्यांचा नातू शंतनूने त्यांना छेडले. त्याच्यातला भौतिकशास्त्रज्ञ जागा झाला. 'तुज सगुण म्हणू की निर्गुण रे' या अभंगावर माधवरावांना म्हणाला, "आजोबा, तुम्ही म्हणता की ज्ञानेश्वर महाराज हे आत्मज्ञानी आणि अत्यंत बुद्धिमान संत होते. मग देवाला सगुण म्हणायचं की निर्गुण असा प्रश्न पडून स्वतः इतके कन्फ्युज कसे झाले आणि मग पळवाट म्हणून 'सगुण निर्गुण एकू गोविंदू रे' असं काहीतरी गुळमुळीत उत्तर दिलं. त्यांनापण देव नक्की कसा आहे हे उत्तर मिळालं नाही बहुतेक. तुम्ही सांगा देव नक्की सगुण की निर्गुण ?" त्यावर माधवराव मंद स्मित करून म्हणाले, "म...