दुसर्यांच्या अपप्रचारामुळे आपल्याच धर्मावर प्रश्न उभे?
मुस्लिम: उर्दू येते आणि कुराण वाचतात इसाई: इंग्रजी येते आणि बायबल वाचतात हिंदू: ना संस्कृत येते ना वेदांबद्दल माहिती फक्त दुसर्यांच्या अपप्रचारामुळे आपल्याच धर्मावर प्रश्न उभे करतात. कटू आहे पण सत्य आहे. *मुस्लिम:* मुळात कुराण हे उर्दू भाषेत नव्हे तर जुन्या *अरेबिक* भाषेत लिहिले गेले आहे, *उर्दूत नव्हे.* ते उर्दूत (आणि जगातील विविध भाषांमध्ये, आता अगदी मराठीत सुद्धा उपलब्ध आहे) अनुवादीत केलेले असू शकते. आणि हा त्यांचा एकमात्र पवित्र ग्रंथ आहे. *इसाई:* बायबल हे मुळात *हिब्रू, अर्माईक आणि ग्रीक* भाषेत लिहिले गेले आहे, *इंग्रजीत नव्हे.* ते नंतर जगभरातील विविध भाषांमध्ये अनुवादीत केले गेले (मराठीत सुद्धा उपलब्ध आहे). इसाई किंवा ख्रिस्ती लोकांसाठी बायबल हा एकमात्र ग्रंथ आहे. *हिंदू:* १)वेद हे *संस्कृत भाषेत* आहेत. भारतात सुमारे १२१ भाषा (२२ अधिकृत भाषा धरून) आहेत तसेच २७० मायबोली आहेत. त्या भाषांमध्ये वेद कधीही उपलब्ध नव्हते. २) संस्कृत भाषा ही फक्त ब्राह्मण जातीची, फक्त अध्ययन-अध्यापनाची भाषा होती. त्यांची बोली भाषा नव्हती. त्या...