विज्ञान आणि अध्यात्म
*विज्ञान आणि अध्यात्म यांचा जीवनाशी संबंध .*
विज्ञान *प्रयोगातून* विकसीत होते
अध्यात्म *योगातून* प्राप्त होते
विज्ञानासाठी *साधने* वापरली जातात
अध्यात्मासाठी *साधना* वापरली जाते
विज्ञानामध्ये *शोध* आहे
अध्यात्मामध्ये *बोध* आहे
विज्ञानामध्ये *तत्व परिक्षा* आहे
अध्यात्मामध्ये *सत्व परीक्षा* आहे
विज्ञानामध्ये *व्यासंग* आहे.
अध्यात्मामध्ये *सत्संग* आहे
विज्ञानामध्ये *कर्तृत्व* आहे.
अध्यात्मामध्ये *दातृत्व* आहे.
विज्ञानामध्ये *शक्ती* आहे.
अध्यात्मामध्ये *भक्ती* आहे.
विज्ञानामध्ये *प्रकल्प* आहेत.
अध्यात्मामध्ये *संकल्प* आहे.
विज्ञानामध्ये *तंत्रज्ञान* आहे.
अध्यात्मामध्ये *आत्मज्ञान* आहे.
विज्ञान *उपभोगास* पोषक आहे.
अध्यात्म *त्यागास* पोषक आहे.
विज्ञानामुळे *पुरुषार्थ* घडतो.
अध्यात्मामुळे *परमार्थ* घडतो.
विज्ञानामुळे *प्रतिष्ठा* वाढते
अध्यात्मामुळे *निष्ठा* वाढते.
विज्ञानामुळे *संपन्नता* प्राप्त होते
अध्यात्मामुळे *प्रसन्नता* प्राप्त होते.
विज्ञानामुळे *प्रसिध्दी* मिळते.
अध्यात्मामुळे *सिध्दी* मिळते.
विज्ञानामुळे *परिस्थीती* बदलते.
अध्यात्मामुळे *मनःस्थिती* बदलते.
विज्ञानामुळे *चातुर्य* विकसीत होते.
अध्यात्मामुळे *चारित्र्य* विकसीत होते.
विज्ञानामध्ये *तपशिलावर* भर आहे.
अध्यात्मामध्ये *तप व शील* यावर भर आहे.
विज्ञानामध्ये *पराक्रम* आहे.
आ
अध्यात्मामध्ये *आत्मसंयम* आहे.
विज्ञानामुळे *भौतीक विकास* होतो.
अध्यात्मामुळे *आत्मीक विकास* होतो.
विज्ञानामुळे *बाह्य सुख* प्राप्त होते.
अध्यात्मामुळे *अंतरआत्म्यातून सुख* प्राप्त होते.
विज्ञानामुळे *अनेक प्रश्न निर्माण होतात.*
आध्यात्मामुळे *सर्व प्रश्न सुटतात.*
विज्ञानामुळे *भौतीकता* सुधारते
अध्यात्मामुळे *नैतीकता* सुधारते.
विज्ञानामुळे *धन* निर्माण होते.
अध्यात्मामुळे *समाधान* निर्माण होते.
विज्ञानाकरीता *उपकरणाची* आवश्यकता.
आध्यात्माकरीता *अंतःकरणाची* आवश्यकता.
विज्ञान *हव्यासाची* पेरणी करते.
अध्यात्म *ध्यासाची* पेरणी करते.
विज्ञान आमचा *विश्वास* आहे.
अध्यात्म आमचा *श्वास* आहे.
विज्ञानामुळे *कार्यास* चालना मिळते.
अध्यात्मामुळे *स्व धर्मास* चालना मिळते.
विज्ञानामुळे *स्वार्थ* निर्माण होतो.
अध्यात्मामुळे *परमार्थ* निर्माण होतो.
विज्ञानामुळे *क्षणिक आनंद* मिळतो.
अध्यात्मामुळे *कायम स्वरूपाचा आनंद* मिळतो.
विज्ञानामुळे जीवनाला *गती* मिळते
अध्यात्मामुळे जीवनाला *योग्य दिशा* मिळते.
खरं सांगायचं तर जिथे विज्ञान संपते
तिथे अध्यात्म सुरु होते...
म्हणून *ज्ञानोबा* म्हणतात त्या प्रमाणे ...
*आधी विज्ञान समजून घेतले पाहिजे कारण संसार त्यावरच चालतो पण विज्ञान म्हणजेच सर्व काही ज्ञान हे मात्र अज्ञान*
याला उत्तर
Copy Paste
🙏🌹🌹🙏
*विज्ञान आणि अध्यात्म यांचा जीवनाशी संबंध .*
विज्ञान *प्रयोगातून* विकसीत होते
अध्यात्म *तुंबलेल्या डबक्यात* प्राप्त होते
विज्ञानासाठी *साधने* वापरली जातात
अध्यात्मासाठी *पोथी पुराणे* वापरली जाते
विज्ञानामध्ये *शोध* आहे
अध्यात्मामध्ये *दुर्बोध* आहे
विज्ञानामध्ये *तत्व परिक्षा* आहे
अध्यात्मामध्ये *विना परीक्षा* पास आहे
विज्ञानामध्ये *व्यासंग* आहे.
अध्यात्मामध्ये *संसर्ग* आहे
विज्ञानामध्ये *कर्तृत्व* आहे.
अध्यात्मामध्ये *आळस* आहे.
विज्ञानामध्ये *शक्ती* आहे.
अध्यात्मामध्ये *पळवाट* आहे.
विज्ञानामध्ये *प्रकल्प* आहेत.
अध्यात्मामध्ये *कल्पना* आहे.
विज्ञानामध्ये *तंत्रज्ञान* आहे.
अध्यात्मामध्ये *अज्ञान* आहे.
विज्ञान *पोषक* आहे.
अध्यात्म *शोषक* आहे.
विज्ञानामुळे *पुरुषार्थ* घडतो.
अध्यात्मामुळे *अनर्थ* घडतो.
विज्ञानामुळे प्रतिष्ठा *वाढते*
अध्यात्मामुळे प्रतिष्ठा *घटते.*
विज्ञानामुळे *संपन्नता* प्राप्त होते
अध्यात्मामुळे *गरीबी, दारिद्र* प्राप्त होते.
विज्ञानामुळे *प्रसिध्दी* मिळते.
अध्यात्मामुळे *कुप्रसिध्दी* मिळते.
विज्ञानामुळे परिस्थीती *बदलते.*
अध्यात्मामुळे परिस्थिती *बदलत नाही.*
विज्ञानामुळे चातुर्य *विकसीत होते.*
अध्यात्मामुळे चातुर्य *लोप पावते.*
विज्ञानामध्ये *प्रत्याक्षिकावर* भर आहे.
अध्यात्मामध्ये *तपशीलावर* भर आहे.
विज्ञानामध्ये *पराक्रम* आहे.
अध्यात्मामध्ये *पाठांतर* आहे.
विज्ञानामुळे *भौतीक विकास* होतो.
अध्यात्मामुळे *आत्मीक विनाश* होतो.
विज्ञानामुळे *बाह्य सुख* प्राप्त होते.
अध्यात्मामुळे *आंतरिक सुखाचा भास* प्राप्त होते.
विज्ञानात *अनेक प्रश्नाची उत्तरे* मिळतात.
आध्यात्मात *प्रश्न विचारूच* नये, अशी बंधने असतात.
विज्ञानामुळे *भौतीक विकास* झाला.
अध्यात्मामुळे *नैतीक विनाश* झाला.
विज्ञानामुळे *धन* निर्माण होते.
अध्यात्मामुळे *गरिबी* निर्माण होते.
विज्ञानाकरीता *उपकरणाची* आवश्यकता.
आध्यात्माकरीता *पोथी पुराणाची* आवश्यकता.
विज्ञान *ध्येय व ध्यासाची* पेरणी करते.
अध्यात्म *स्वर्ग व नरकाच्या भीतीची* पेरणी करते.
विज्ञान आमचा *श्वास* आहे.
अध्यात्म आमचा *अंधविश्वास* आहे.
विज्ञानामुळे *कार्यास* चालना मिळते.
अध्यात्मामुळे *धर्म द्वेषास* चालना मिळते.
विज्ञानामुळे *नि:स्वार्थता* निर्माण होतो.
अध्यात्मामुळे *स्वधर्माभिमान* निर्माण होतो.
विज्ञानामुळे *जीवनात आनंद* मिळते.
अध्यात्मामुळे *भीती, गरिबी,* मिळते.
विज्ञानामुळे जीवनाला *गती* मिळते
अध्यात्मामुळे जीवन *दिशाहीन* होते.
खरं सांगायचं तर जिथे अध्यात्म संपले,
तिथे विज्ञान आरंभले....
म्हणून *ज्ञानोबा* म्हणतात त्या प्रमाणे ...
*आधी विज्ञान समजून घेतले पाहिजे कारण संसार त्यावरच चालतो पण विज्ञान म्हणजेच सर्व काही ज्ञान मिळाले असे नसून विज्ञान ही सततची प्रक्रिया आहे..चुकत चुकत शिकायचं आहे.*
*अध्यात्म डबक्यासारखं कधीच संपलेलं आहे. विज्ञानाची कास धरा जीवन समृद्ध करा.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा