एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या बाहेर एक मोठ्या चैनलचे पत्रकार आपल्या लक्झरी कार मधे बसून निघणारच होते की एक जोडपं अतिशय सभ्य दिसणारं त्यांच्या गाडीसमोर येउन थांबलं ....ड्रायव्हर ने गाडी थांबवली तो मनुष्य पत्रकार साहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला "साहेब येथून मेन रोड पर्यंत जाण्यासाठी कुठलही वाहन नाहीये ...मेहरबानी करुन आम्हाला तिथपर्यंत लिफ्ट द्या तेथून आम्ही बस पकडून जाऊ. रात्री चे साडेअकरा वाजले होते आणि त्यांच्या कडेवर एक मूलही होतं ....पत्रकार साहेबांचं मन कळवळलं आणि त्यांनी त्या जोडप्याला आत घेतलं ...ड्रायवर कार पुढे दामटू लागला गाडी थोडी पुढे जाताच शरणार्थी म्हणून गाडीत बसलेलं ते जोडपं एकमेकांना बघून कुटील हसलं...... प्लैन सक्सेस/कामगिरी फत्ते हा भाव त्यांच्या डोळ्यात होता ....त्यांच्या पैकी पुरुषाने लगेच आपले पाय पसरवले आणि न विचारता /न मागता गाडीतली पाण्याची बाटली उचलली आणि सरळ तोंडाला लावली... महिला देखील मुलाला खाली सोडून गाडीत इकडे तिकडे चापसू लागली ....तिच्या हाती एक ड्रेस लागला, लगेच तिने तो उचलला आणि तो ड्रेस स्वतःला लाऊन बघू लागली... आता मात्र पत्रकार साहेबांची स...
पोस्ट्स
फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
नक्की कोण???
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*आम्हाला आलेला मेसेज आणि "चला उत्तर देऊ या" ग्रुपने दिलेले उत्तर* मुळ मेसेज 👇🏽 *कोण?* कोण फिरवतो कालचक्र हे? दिवसामागून रात्र निरंतर कोण मोजतो खेळ संपता? आयुष्याचे अचूक अंतर कोण निर्मितो श्वासांसाठी? करूणेचा हा अमृतवारा कोण फुलवतो आठवणींनी? रंध्रारंध्रातुन पिसारा कोण राखतो काळजावरी? शरीराचा हा खडा पहारा कोण शिकवतो कसा धरावा? स्वप्नांमधला मुठीत पारा कोण ठरवतो; पाऊस येथे कधी दडावा, कधी पडावा? कोण सांगतो कधी कसा अन, कोणावरती जीव जडावा? कोण पढवतो जगता जगता? नावडता, तरी हात धरावा कोण रोखतो अदम्य ईच्छा? हृदयामधला श्वास सरावा कोण भरितो श्वासांमधूनी? रक्तामधल्या प्रेमळ लहरी कोण साठवी गंध कळ्यांतून? दवभरल्या या गुलाबप्रहरी रात्रीच्या या रोज ललाटी चंद्रटिळा हा कोण रेखितो? वसुंधरेला न्हाता न्हाता सूर्याआधी कोण देखितो? आई नसता जगात जरीही घास भरवतो कोण तरीही? पहाट स्वर्णिल कोण दावितो? कटू स्मृतींची रात्र जरीही रचतो कैसा कोण नभातुन? थेंबांमधली भिजली गाणी मातीच्या या ओठांमधूनी कोण बोलतो हिरवी वाणी? कोहं कोहं कोण वदवितो? प्रश्न चिरंतन, बाकी नश्वर कोण लुब्ध जो या सृष्टीवर? नतमस्तक हे उत्तर ...