पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
🤔खरच विचार करायला लावनारी पोस्ट.    खरी अंधश्रद्धा कोणती ?😳 अंधश्रद्धा निर्मूलन 📣।।होय निर्भीडच।।📣 फुले, शाहू, आंबेडकर यांनी शिवरायाना मानले शिवरायांनी संत तुकारामाना मानले, संत तुकाराम महाराज यानी विठ्ठलपांडुरंगाला मानले, पांडुरंग दगडाचा देव, त्या मुर्तीला पूजतो मी, समंजसपणे सांगतो मी, दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. ! माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी, का? --अन्नदान होते --दवाखाना चालतो --शिक्षण संस्था चालते --परिसराचा विकास होतो आणि हो-- -देव/मंदिर फक्त भटजीसाठी नसतात हो -! -- मुर्तीकार -- फुलझाडे लावणारा शेतकरी -- फुले विकणारा माळी -- बेल आणणारा मजूर -- बेल विकणारा गुरव -- नारळ, प्रसाद विकणारा दुकानदार -- हॉटेल चालक -- स्टेशन वरून भक्तांना मंदिरापाशी आणणारा रिक्षा चालक -- मंदिर बांधणारे ईंजिनिअर, गवंडी, मजुर हे सर्वजण काही भटजी नसतात हो या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो हो ! म्हणून मायच्यान सांगतो, या सर्वात देवत्व शोधणारा माणूस आहे मी-! दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी -! दानपेटी घेऊन फिरत नाही दारोदारी "पूजा करा ...

शस्त्रपूजन

शस्त्रपूजन शास्त्रोक्तच हवे ! संपादकीय देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये ‘राफेल’या लढाऊ विमानाचे पूजन करतांना विमानाच्या चाकांपुढे लिंबू ठेवले. पूजन करतांना लिंबू ठेवल्याने त्याचा परिणाम भारतातील काँग्रेस पक्षासह धर्मनिरपेक्ष, तथाकथित पुरोगामी, हिंदु धर्मविरोधी आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर तितकाच परिणामकारक झाला. पूजनातील लिंबाच्या शक्तीचा परिणाम एवढा होता की, वर उल्लेखलेल्या सर्वांनाच त्याचा पोटशूळ उठला. त्यातून दिवसभर सर्वांनी त्यावर स्वतःची नास्तिक आणि पुरोगामी मते प्रसारमाध्यमे अन् सामाजिक माध्यमे यांतून व्यक्त करण्यास प्रारंभ केला. या सर्वांतून देशातील जनतेच्या पुन्हा लक्षात आले की, आस्तिक कोण आहेत आणि हिंदु धर्मातील परंपरांना विरोध करणारे कोण आहेत ? खरेतर संरक्षणमंत्र्यांनी लढाऊ विमानाचे विधीवत् पूजन केले, त्यासाठी त्यांचे आणि केंद्रातील भाजप सरकारचे अभिनंदन ! काँग्रेसवाल्यांना पोटशूळ का ? पूजेत लिंबू ठेवल्यामुळे काँग्रेसने या प्रकाराला ‘तमाशा’ आणि ‘ड्रामा’, पुरो(अधो)गाम्यांनी त्याला ‘अंधश्रद्धा’ म्हटले. धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामीपणा यांचा डांगोरा पिटणारे,...
इमेज
हे परम ईश्वरा... कुठे असशील खरोखर तर, आणि हे स्वगत, अनामिक अज्ञात लहरींद्वारे जर पोचत असेल तुझ्यापर्यंत, तर काही मागायचं आहे रे तुला.. छोट्या छोट्या लेकरांना पोटभर खायला मिळू दे रे सर्वांच्याच..कुपोषणानं हाल हाल होऊन मरण्याइतकी चूक तरी काय असते त्यांची? लहान लहानग्यांना कोणीही ओरबाडून ओचकरून लचके तोडून फेकू देऊ नये रे, या साठी कर ना काहीतरी..कर ना त्यांच्या वासनेचं रूपांतर ममतेत.. सगळे श्वास,आभास,फुलांच्या फुलण्यापासून ते ग्रहताऱ्यांचं भ्रमण ही तूच नियंत्रित करतोस ना? मग  पोटाच्या टीचभर खळग्यासाठी वेश्या बनून एका रात्रीत दहा जणांना अंगावर घेण्याचं दुःख एकाही स्त्री वर येऊ नये यासाठी काही करता येतंय का बघ.. तू कर्ता करविता आहेस ना? मग सगळं शोषणही तूच घडवून आणतोस असं आम्ही समजायचं का? मुलगा हवाच म्हणून एकामागून एक मुली जन्माला घालत राहून एखादया बाळंतपणात चुपचाप मरून  जाणाऱ्या बायका तुझ्यासारख्या विघहर्त्याला आयुष्यभर पूजेत आलेल्या असतात रे,एकही उपवास सोडत नाहीत बापूडया. तुझ्या सर्वशक्तिमान स्वरूपाचं दर्शन घडवून तू आता हे जग सावरायलाच हवंस.. केवढे ते अणुबॉ...