विज्ञान आम्हाला कुठून कुठे घेऊन आले?

⏰ *विज्ञान आम्हाला कुठून कुठे घेऊन आले??*🤔

*पहिले*:- लोकं विहिरीतील गढूळ पाणी पिऊनही १०० वर्ष जगत होते.
*अाता* :- RO चे शुध्द
 पानी पिऊनही ४० वर्षात म्हातारे होत आहेत. 🥛

*वस्तुस्थितीः* 👉  वास्तविक पूर्वी सर्वच नाही तर खुप कमी लोकं शंभरी पार करायचे. पण सरासरी आयुष्यमान ४०/५०वर्ष होतं तेच आता सरासरी ७०वर्ष झालेलं आहे. दुषित पाण्याने होणाऱ्या साथीच्या आजाराने बहूसंख्य लोक मरायचे. ती संख्या शुध्द पाण्यामुळे कमी झालेली आहे,

*पहिले*:- लोकं घाण्यातील अशुद्ध तेल खाऊनही म्हातारपणात मेहनत करीत असत.
🍯 *अाता*:- आम्ही  डबल-फ़िल्टर तेल खाऊनही जवानी मध्येच दम लागत आहे.
*वस्तुस्थिती* 👉  पूर्वी अंगमेहनतीची अर्थात घाम गाळणारी कामं केल्याने माणसं धडधाकट असायची, पण आता मेहनतीची सवय नसल्याने दम लागत आहे,

*पहिले*:- लोकं खडे वाला अशुद्ध मीठ खाऊनही आजार त्यांच्या जवळ येत नसत.
*अाता*:- आम्ही आयोडीन युक्त मीठ खाऊनही
हाय-लो बीपी घेऊन बसलो आहे.🍧
*वस्तुस्थिती*👉 
बीपी वाढण्याची कारणं अनियमित दिनचर्या, अनियंत्रित खाणं आणि खाण्यापिण्याच्या वेळा यामध्ये आहेत. मिठातल्या आयोडीनशी त्याचा काही संबध नाही.
*पहिले* :- लोकं लिंबाची काटी, कोळसा, मीठ घासून दात चमकवत असत, आणि
🤑 80 वर्षाचे झाले तरी अन्न चावून खात असत.
*अाता*:- कोलगेट सुरक्षा वाले
डेंटिस्ट चे चक्कर खात आहेत.
*वस्तुस्थिती*👉
पूर्वी डेंटिस्ट होते का? वैद्य/हकिम दात काढून टाकून देत होते. तेच आज सडलेल्या/किडलेल्या दातांना पर्यायी दात बसवता येतात,

*पहिले* :- लोकं नाड़ी पकडून
रोग सांगत असत.
*अाता*:- संपूर्ण शरीर मशिन मध्ये चेक करूनही रोग सापडत नाही. 🔦
*वस्तुस्थिती*👉
नाडीने हृदयाचे ठोके समजतात, रोगाचं निदान नाही. नाडीने निदान कळालं असतं तर नाडीवाल्यांचं नामोनिशाण का मिटलं असतं?

*पहिले*:-  ७-८ मुले जन्माला घातलेली स्त्री ८० वर्षाच्या वयातही शेतात काम करीत असत.
*अाता* :- स्त्री पहिल्या महिन्यापासून डाॅक्टरांच्या देखरेखीखाली असतात. तरीही पोट फाडून मुले जन्माला येतात. 
*वस्तुस्थिती*👉 आजपण मेहनत करणाऱ्या बायकांना सिझेरियन नाही करावं लागत, बिना कारणांने सिझेरियन करणारे डाँक्टर पैशासाठी स्वार्थी  असतात.


*पहिले* :- काळ्या गुळाची मिठाई मजबूत खात असत.
*अाता*:- मिठाई खान्याच्या आधीच डायबिटिज होत आहे. 🍓
*वस्तुस्थिती*👉 केवळ मिठाई खाल्ल्याने नाही तर खाण्यावर कोणतंही नियंत्रण नसल्याने डायबिटीस होतो. खाण्याचे पदार्थ पूर्वी मर्यादित होते.


*पहिले* :- म्हाताऱ्यांचेही गुडघे दुखत नसतं.
🧖‍♂ *आता* :-जवान सुध्दा गुढघे आणि कंबर दुखन्याने हैराण आहेत.
*वस्तुस्थिती*👉
बदललेली जीवनशैली आणि अंगमेहनतीचा अभाव यामुळे असे आजार बळावलेत.

*पहिले*:- 100 w चे बल्ब 💡होते तरीही विजेचे बिल २०० रुपये येत असतं.
*अाता*:- ९ w चा c.f.l च्या लाईट असूनही २००० रुपये बिल येत आहे.
*वस्तुस्थिती*👉
आता टिव्ही, फ्रिज बरोबर कितीतरी वस्तुंसाठी विजेचा वापर वाढलेला आहे. विजेचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. पूर्वी २००रुपयांत संपूर्ण कुटूंबाचे भागत होते, आज २००००मध्ये फक्त दोघांचा मासिक खर्च तरी भागतो का?
आणि यात विज्ञानाचा काय दोष?

*शेवटी मला हेच समजत नाही...*
*हे विज्ञान चे युग आहे की, अज्ञान चे?*

*वस्तुस्थिती*👉
विज्ञानाचे सगळे फायदे उचलून स्वतःच्या अज्ञानाचा अभिमान मिरवून, केवळ "जून ते सोनं" हे रडगाणं आळवून भावनिक होण्यात काय अर्थ आहे?
विज्ञानाचा शोध असलेला मोबाईल, काँम्पुटर, टिव्ही, वायफाय, नवनवीन तंत्रज्ञानाच्या गाड्या, हाँस्पिटलमधील अत्याधुनिक यंत्रणा यांचा वापर करुन,
वर विज्ञानाला दोष देवून अज्ञानाचा अभिमान बाळगणारे खरोखरच धन्य म्हणायला हवेत.
विज्ञानाला किंवा सर्व समस्येच कारणं विज्ञान आहे, म्हणणारांनी स्वतः विज्ञानाचा आधार असणाऱ्या सर्व गोष्टी सोडाव्यात. आणि विज्ञानविरोधी प्रसार करावा.
हो, पण तो करणार कसा?


(चला उत्तर देवू या...टिम)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजीव दीक्षित डॉ. नरेंद्र दाभोलकरांना कधीही भेटले नाहीत

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य