मंत्रशास्र व रोगमुक्ती.


            *मंत्रशास्र व रोगमुक्ती.*

*मंत्र हा शब्द "मनसा त्रायतो इति मंत्रः" या व्युत्पत्ती पासून सुरु होतो. मंत्राचा वापर वाचेने, मनाने, चिंतनाने होतो. मंत्राचे पठण, जप करून उपचार करीत असतांना ज्या स्पंदनलहरी निर्माण होतात त्यामुळे शाररिक ऊर्जास्रोतांची कमतरता भरून निघते व त्याचा फायदा व्यक्ती व्याधीमुक्त होते.*

*मंत्रामध्ये रोग, व्याधी व पीडा निवारणाचे जबरदस्त सामर्थ्य असून योग्य रीतीने शुध्दता पाळून मंत्राचा उपयोग व्याधिनिवरण्यास केला, तर असाध्य रोग सुद्धा  मंत्रोपचाराच्या माध्यमातून बरे होतात.*

*उत्तम आरोग्य प्राप्ती साठी मंत्र*

*"सूर्यकवच वाचणे."*
*"ओं ऱ्हिमं नमः"*
*"नारायणाय नमः, गोविंदाय नमः"*
*"ओं नमः शिवाय '*
*शरीरातील एखादा भाग दुखत असेल तर त्यावरील निवारण मंत्र.....*

*१.डोकेदुखी - श्री राघवाय नमः*
*२.कपाळ - दशरथात्मजाय नमः*
*३.नेत्र - कौशल्येयाय नमः*
*४.कान- विश्वमित्रप्रियाय नमः*
*५.नाक- मखत्रात्रे नमः*
*६.मुख - सौमित्रीवत्सलाय नमः*
*७.जीभ - विद्यानिधये नमः*
*८.कंठ - भरतवंदिताय नमः*
*९.खांदे - दिव्यायुधाय नमः*
*१०.दंड -  भग्नेशकार्मुकाय नमः.*
*११.हात - सितापतये नमः*
*१२.हृदय - ओं ऱ्हिमं सूर्याय नमः*
*१३.शरीरातील मध्य भाग - खरध्वनसाय नमः*
*१४.नाभी - जाम्बवदाश्रयाय नमः*
*१५.कंबर - सुग्रावेशाय नमः*
*१६.जंघा - हनुमत्तप्रभावें नमः*
*१७.मांडी - रघुत्तमाय नमः*
*१८.घुडघे - सेतुकृते नमः*
*१९.पिंडरी - दशमुखांतकाय नमः*
*२०.पावले - बिभीषणश्रीदाय नमः*
*२१.सर्व शरीर रक्षण -श्रीरामाय नम:*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*मंत्रशास्त्र व रोग मुक्ती या दाव्याला दिलेले उत्तर...*

मंत्र म्हणताना स्पंदन लहरी निर्माण होतात हे अगदी खरे आहे पण तशा स्पंदन लहरी अपशब्द बोलल्यानेही निर्माण होतच असतात.

या स्पंदन लहरी मुळे ऊर्जा स्त्रोतांची कमतरता भरून निघते याला कोणताही शास्त्रीय आधार नाही त्यामुळे मंत्र म्हटल्याने रोगमुक्ती मिळते हा दावा फोल ठरतो.

शरीरात उर्जा मंत्रामुळे नाही तर चौरस आहार खाल्ल्यामुळे निर्माण होते

मंत्राने माणूस फक्त मंत्रमुग्ध होतो, प्रत्यक्षात साधा भाजलेला पापड तोडू शकेल एवढी सुद्धा शक्ती मंत्रात नसते.

वैद्यकीय उपचाराविना फक्त मंत्राच्या सहाय्याने रोगमुक्ती शक्य नाही.
असा दावा करणाऱ्यांनी सप्रयोग सिद्ध करून दाखवावे.

*चौरस, आरोग्यपूर्ण आहार घ्या, नियमित व्यायाम करा, व्यसनापासून दूर रहा, या तंत्राने वागलात तर कुठलाही मंत्राची गरज लागणार नाही आणि निरोगी व चांगले जीवन जगाल.*

*चला उत्तर देऊया - टीम*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?