प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?
सध्या सोशल मीडियावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना आरशाची काच कशी आपोआप फुटते याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करताना मूर्तीच्या समोर एक व्यक्ती आरसा धरून उभी असते. मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढली की समोरच्या आरशाची काच आपोआप फुटते. त्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की ही काच मूर्तीमध्ये असलेल्या शक्तीमुळे फुटली आहे. हा चमत्कार म्हणजे हातचलाखी आहे. मूर्तीसमोर धरलेला आरसा प्लॅस्टिकच्या फ्रेमचा आहे. मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढली की आरशाच्या पाठीमागून अंगठ्याने जोरात दाब दिला जातो आणि त्यामुळे आरशाची काच फुटते. हा चमत्कार कुणीही करू शकतो. प्लॅस्टिकच्या फ्रेमचा आरसा वापरण्याऐवजी लाकडी फ्रेम असणारा आरसा वापरून कुणीही हा चमत्कार करून दाखवावा. त्यांना तो करता येणार नाही. कारण काचेच्या पाठीमागे जाड लाकडी आवरण असल्याने अंगठ्याने कितीही दाब दिला तरी काच फुटणार नाही कुठल्याही मंत्रामध्ये कसलीही ताकद नसते. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हटल्याने कुठल्याही मूर्तीमध्ये प्राण येत नसतो, हे वास्तव आहे. परंतु लो...