गायत्री मंत्रात किती सामर्थ्य आहे?
"गायत्री मंत्र हा जगातला एकमेव पाॅवरफुल मंत्र आहे असे डॉ. हाॅवर्ड स्टेनरेजिल यांनी जाहीर केले आहे...त्यांनी जगातील सर्व मंत्र गोळा केले असून त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत चाचणी घेतली आहे... त्यांना असे आढळले की फक्त गायत्री मंत्र हाच एकमेव सर्वोच्च शक्तिशाली मंत्र आहे... हिंदूंचा हा मंत्र एका सेकंदात एक लाख दहा हजार ध्वनी लहरी निर्माण करतो असे त्यांना आढळले.... एवढ्या प्रचंड ध्वनी लहरींमुळे व तरंगलांबी मुळे अध्यात्मिक क्षमता प्रचंड वाढते....गायत्री मंत्राचे शारीरिक व मानसिक फायदे खूप आहेत... अमेरिकेतील एका राज्यात व हॉलंड मध्ये रेडिओ स्टेशन वरून रोज गायत्री मंत्र म्हटले जातात..." अशा आशयाची पोस्ट फिरत असते...!! वास्तवात जगातील कोणत्याही धर्माच्या वा संस्कृतीच्या मंत्रांमध्ये कोणतेही सामर्थ्य नसते. कारण मंत्र-तंत्राने जर रोग बरे झाले असते व समाज सुखी झाला असता तर, राजकारण अस्तित्वात आले नसते आणि शासन यंत्रणा निर्माण करण्याची गरजच उरली नसती ! मग वरील पोस्टमध्ये जे दावे करण्यात आलेले आहेत त्यात तथ्य किती आहे याचा धांडोळा आपण घेऊ या... गायत्री मंत्र...