ग्रहण

*ग्रहण काळात परातीमध्ये 90 अंशात मुसळ कसे उभे राहते अशी ‘भाबडी’ विचारणा करणारी पोस्ट सध्या फिरत आहे त्यास हे उत्तर...*

मुसळ हे एक सरळसोट लाकूड असते व त्याचा तळ (कुटण्याचे टोक) हे सपाट असते. तसेच त्याचा तळभाग जड व किंचित पसरट असतो. कारण तळ जेव्हढा वजनदार तेव्हढी त्याला जास्त स्थिरता प्राप्त होते व कुटण्याची क्रीयाहि चांगली होते. लहान मुलांना खेळण्यास देण्यात येणारी डोलणारी बाहुली आडवी केली तरी न पडता उठून उभी राहाते. कारण तिचा तळभाग जड केलेला असतो.ह्याचसाठी डबलडेकर बसमध्ये खालच्या मजल्यावर उभे प्रवासी घेतात, पण वरच्या मजल्यावर नाही. तसेच जहाजात इंजिनारूम्स वा सामान ठेवण्याच्या जागा बोटीच्या तळभागातच असतात. त्यामुळे तिचा तळभाग जड होऊन बोट पाण्यावर हेलकावे न खाता स्थिर राहू शकते. एवढेच काय पण विमानातही कार्गो म्हणजे सामान व त्याचे इंजिनही त्याच्या पोटात म्हणजेच तळभागात असते, त्यामुळेच विमान हवेतही फार हेलकावे न खाता स्थिरापणे प्रवास करू शकते. *या गुणधर्माला भौतिकाशास्त्रात गुरुत्वामध्याचा ( centre of gravity) गुणधर्म असे म्हणतात.*

*म्हणूनच मुसळच काय अशा आकाराचे कुठलेही लाकूड सपाट पृष्टभागवर कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी उभे करून ठेवल्यास ते तसेच उभे राहते.*

मुसळ 90 अंशात उभे राहते तेंव्हा त्याचा गुरुत्वमध्य( centre of gravity) त्याचा पायाच्या (टेकलेल्या भागाच्या) आत असतो म्हणून मुसळ पडत नाही. लहानश्याही हादऱ्याने किंवा वाऱ्याने गुरुत्वमध्य ढळल्यास - म्हणजेच ते त्याच्या पायाच्या बाहेर गेल्यास - ते पडते. हे सांगायला खरे तर कोणा विज्ञानवाद्याची गरज नाही. कारण हे काही रॉकेट सायन्स नाही.
सरतेशेवटी मुसळ उभं राहण्यात काय आणि कसला आलाय चमत्कार?? ते कितीहि वेळ उभं राहिलं व आपण ते बघत राहिलो, तर आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे?

*गुरुत्वमध्य विषयाचे जुजबी शालेय ज्ञान असलेला कोणीही याचे उत्तर देऊ शकतो.*

*चला उत्तर देऊया-टीम*
👊🏼👊🏼👊🏼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?