पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका सुशिक्षिताची कैफियत

एका सुशिक्षिताची कैफियत :  (^m^) (^j^) (मनोगते) लहान मुलांचे वय वर्षे दोन/तीन पासून शिक्षणाचे माध्यम इंग्लिश केल्याने जाणवणारे दुष्परिणाम, ज्यांची व्याप्ती खूपच मोठी व गंभीर आहे ............ १) मुलांमध्ये मातृभाषे विषयी गोडी राहत नाही. त्यांना मातृभाषेतील लहानसहान शब्दही नीट येत नाहीत. त्याची नैसर्गिक मजा मुलांना अनुभवता येत नाही. २) पालकांचा "घरी मराठी करून घेऊ, मातृभाषा तर आहे." हा विश्वास सार्थ ठरत नाही. मग काही वर्षांनी असे जाणवते की, लहान मुलांना विषय समजण्यात खूप अवघड जात आहेत. अतिरिक्त शिकविण्या लावूनही फारसा उपयोग होत नाही. मुलांना इंग्लिश मधून विषय समजत नाहीत. परिणामी मूल घोकंपट्टीवर जोर देते. आणि अभ्यास फक्त मार्कांसाठीच करायचा असतो हा संस्कार त्यांच्यात रुजतो. मुलांचे बालपण संपुष्टात येते. पालक आणि मुलांमध्ये तणाव निर्माण होतो. ३) मातृभाषेतील वर्तमानपत्रे, पुस्तके, कथा, कादंबऱ्या, बालनाट्ये, नाटके, बालसाहित्य, चित्रपट इत्यादी अनेक गोष्टी मुलांना कांटाळवाण्या वाटू लागतात. त्यात त्यांना रस वाटत नाही. पर्यायाने बाल रंगभूमीलाही नाटके मिळत नाहीत... त्यात काम करणारी मुले...