पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एपीजे यांच्या नावाने फिरणार्‍या पोस्ट ला उत्तर.

एपीजे यांच्या नावाने फिरणार्‍या पोस्ट ला उत्तर. *ती पोस्ट* : आमच्या 3000 वर्षातील इतिहासात जगातील विविध कानाकोपऱ्यातून लोकं भारतात आले आणि आम्हाला लुटून निघून गेले , आमची जमीन काबीज केली, आमच्या बुद्धीला गुलाम बनविले. अलेक्झांडर पासून ग्रीक, तुर्क, मुघल, पोर्तुगाल , ब्रिटिश, फ्रेंच, डच सर्वांनी आमच्या देशाला लुटले...... हे सर्व आमच्या देशात आले आणि आम्हाला लुटले आणि जे काही आमचे होते ते सर्व घेऊन गेले...... परंतु आजपर्यंत आम्ही दुसऱ्या देशासोबत असे केले नाही. आम्ही कुणालाही आपले गुलाम नाही बनविले. आम्ही कोण्या देशाची जमीन काबीज केली नाही, कोणत्याही देशाच्या संस्कृतिला ठेच पोहोचविली नाही आणि कोण्या देशाची जीवनपद्धती बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही असे का करतो? कारण कि आम्ही दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो.......... @एपीजे... *आता या पोस्टचे विश्लेषण करून निर्माण होणारे काही प्रश्न, एपीजे यांचा आदर राखून, विचारत आहे:* १) तीन हजार वर्षाच्या इतिहासात जगाच्या (१९५ पैकी १९४ देशातून) कोणत्या कानाकोपर्‍यातून लोक *भारतात* आले बरे? आणि संपूर्ण तीन हजार वर्षे इथे त्यांचा...