पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विज्ञान आम्हाला कुठून कुठे घेऊन आले?

⏰ *विज्ञान आम्हाला कुठून कुठे घेऊन आले??*🤔 *पहिले*:- लोकं विहिरीतील गढूळ पाणी पिऊनही १०० वर्ष जगत होते. *अाता* :- RO चे शुध्द  पानी पिऊनही ४० वर्षात म्हातारे होत आहेत. 🥛 *वस्तुस्थितीः* 👉  वास्तविक पूर्वी सर्वच नाही तर खुप कमी लोकं शंभरी पार करायचे. पण सरासरी आयुष्यमान ४०/५०वर्ष होतं तेच आता सरासरी ७०वर्ष झालेलं आहे. दुषित पाण्याने होणाऱ्या साथीच्या आजाराने बहूसंख्य लोक मरायचे. ती संख्या शुध्द पाण्यामुळे कमी झालेली आहे, *पहिले*:- लोकं घाण्यातील अशुद्ध तेल खाऊनही म्हातारपणात मेहनत करीत असत. 🍯 *अाता*:- आम्ही  डबल-फ़िल्टर तेल खाऊनही जवानी मध्येच दम लागत आहे. *वस्तुस्थिती* 👉  पूर्वी अंगमेहनतीची अर्थात घाम गाळणारी कामं केल्याने माणसं धडधाकट असायची, पण आता मेहनतीची सवय नसल्याने दम लागत आहे, *पहिले*:- लोकं खडे वाला अशुद्ध मीठ खाऊनही आजार त्यांच्या जवळ येत नसत. *अाता*:- आम्ही आयोडीन युक्त मीठ खाऊनही हाय-लो बीपी घेऊन बसलो आहे.🍧 *वस्तुस्थिती*👉  बीपी वाढण्याची कारणं अनियमित दिनचर्या, अनियंत्रित खाणं आणि खाण्यापिण्याच्या वेळा यामध्ये आहेत. मिठातल्या आय...