खडे टाकणारा देव
इंजिनिअर व मजूर आपल्या देशातील जवळपास 99 टक्के देवभक्तांचा व देवाला गुंड ठरवून त्याचा अपमान करणारी ही वरील पोस्ट तर्कदुष्ट सुद्धा आहे. कारण : 1) यात इंजिनियरला ‘देव’ व मजुराला देवाकडे लक्ष न देणारा ‘भक्त’ असे कल्पिले आहे. ही कल्पनाच मुळात तर्कदुष्ट व गैरलागू आहे. इथे इंजिनियरला मजुराकडून काही काम करून घेण्यासाठी त्याचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. खरे तर अशा ठिकाणी एक घंटा लावलेली असतांना (जिचा दोर किंवा बटन वरती असते व त्याची गरज नेहमी भासते) ती वाजवायचे सोडून नाणी व नंतर खडा फेकणारा इंजिनियररूपी ‘देव’ मूर्ख व बिनडोक वाटतो. त्याने आधीच खडा फेकायचा होता ना! इथे मजूर शहाणा वाटतो. कारण लक्ष वेधून घेण्यासाठी कोणी पैसे फेकत नाही हे ज्ञान त्याला आहे व म्हणून तो पैसे उचलतो व खडा पडल्यावर लक्ष देतो. 2) देवाला सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, दयाळू, ‘चोच दिली आहे तर चारा देणारा’, वगैरे मानले जाते. परंतु, आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी देव, माणसाच्या आयुष्यात संकटाचा खडा टाकतो असे पोस्ट मध्ये लिहलेले आहे. असे असेल तर, ‘माझ्याकडे लक्ष दे, नाहीतर घालतोच तुला संकटात!’ अशी प्रवृत्ती अस...