पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुंकवाच्या अफवा

कुंकवाच्या अफवा... (^m^) (^j^) (मनोगते) 'महिलांनी कुंकू का लावावे ?' या फेसबुक आणि व्हॉटस्अँपवर धर्मअंध हिंदुत्ववाद्यांकडून पसरवण्यात येत असलेल्या पोस्ट्स बद्दल... सर्व प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की त्यांनी ही फेक स्टोरी बनवली आहे. कारण चारही वेदांमधे व उपनिषदात कुठेही स्त्रियांनी कुंकू लावावे असा उल्लेख सापडत नाही. त्यांच्या अनेक शतकानंतर लिहिले गेलेल्या रामायण या ग्रंथात देखील दशरथ गेल्यानंतर त्यांच्या 3 ही पत्नीनी कुंकू पुसले असे लिहिल्याचा कुठेही उल्लेख रामयणाच्या जुन्यातल्या जुन्या प्रतीत आढळत नाही. तसेच त्यावेळच्या उत्तर भारतातील आर्य संस्कृतीत कुठेही कुंकू अस्तित्वात नव्हते. हिंदू धर्मात कर्मकांड वाढीला लागल्यानंतर स्त्रियांना दुय्यम स्थानावर टाकण्यासाठी त्याकाळच्या पुरोहितांकडून कुंकू या सौभाग्य लेण्यांवर भर देण्यात आला. त्यासाठी छद्म विज्ञानाचा आधार घेऊन पिट्यूटरी ग्लैंड, एक्यूप्रेशर ही माहिती देखील भारतीयांना होती असे भासवण्यात आले. पण असा उल्लेख आयुर्वेदशी सम्बंधित चरक, सुश्रुत वग़ैरे कुठल्या ही ग्रंथात नाहिये. एक्यूप्रेशर ही चीनी वैद्यकीय विद्या आहे जी त्याका...