राजापूरची गंगा आणि सत्य
राजापूरची गंगा दर तीन वर्षांनी अवतरते व साधारणतः दोन महीने राहते असे म्हटले जाते. तिचे दर तीन वर्षांनी अवतरणे व सुमारे दोन महीने राहणे ही एक मान्यता आहे. तसेच ती येते कुठून ही दुसरी बाब आहे. यातील दुसर्या बाबी बाबत भूगर्भशास्त्रज्ञ असे म्हणतात की हा भूगर्भीय वक्र नलिकेचा (siphon) प्रकार असावा. भूगर्भातील हालचाली सुद्धा या गंगेचे वेळी अवेळी येण्यास कारण असाव्यात. कुठल्याही एकाद्या झर्या सारखाच, थोडी वेगळी पार्श्वभूमी असलेला हा एक झरा आहे. पावसाळ्यात दिसणारे धबधबे पाऊस (म्हणजे पाण्याचा स्त्रोत) संपताच गायब होतात. त्याच प्रमाणे शुद्ध तर्क शास्त्र वापरल्यास राजापूरच्या गंगेच्या पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होताच ती अवतरते व संपला की आटते, असे म्हणता येईल. *आपण भारतीय धबधब्याला, अन्य झर्यांना चमत्कार मानत नाही पण या गंगेला मात्र मानतो.* या गंगेला चमत्कार मानण्याचे दुसरे कारण असावे की दर तीन वर्षांनी प्रकट होते. तसेच भर पावसाळ्यात तिची कुंडे कोरडी असतात असाही एक समज आहे. परंतु उपलब्ध माहितीच्या आधारे दिसून येते की ही वस्तुस्थिती नाही. इंटरनेट वर शोधलेल्या विविध साइट्स व वर्तमान पत्र...