हिमालयीन फसवणूक
*पहाटे 3 वाजता हिमालयामधील सूर्योदय त्यात इडा पिंगला सुषमा नाडीबरोबर मुलाधारासह अर्धचंद्रमाचे रुप दिसते त्याला शंकराचे विश्व्ररुप ही म्हणतात* अशा शीर्षकाखाली एक व्हीडीओ क्लिप हल्ली व्हाट्सअॅप 'बाजारात' आलेली दिसते. यामध्ये सूर्योदय किंवा सूर्यास्त समयीचे एक सुंदर दृश्य चित्रित केले आहे. त्यात मध्यभागी सूर्य, सूर्याच्या भोवती प्रकाशमान अर्धवर्तुळ, त्या अर्धवर्तुळाच्या वरील टोकाला अजून एक सूर्य तसेच क्षितिजावरील दोन बाजूंना दोन सूर्य असल्याचा भास होतो आहे. अशा आयत्याच लाभलेल्या सुंदर दृश्याच्या व्हीडीओमध्ये लेगेच आपला 'देव', घुसवण्यात भारतीय मागे कसे राहतील? त्यात त्यांना इडा, पिंगला, सुषमा नदी, मूलाधार, अर्धचंद्र आणि शेवटी शंकराचे विश्वरूप दिसू लागले. आता याचे विश्लेषण करू या: १) सदर व्हीडीओ हा "हिमालयातील" पहाटे तीन वाजताचा आहे असा दावा केला आहे. परंतु हा व्हीडीओ हिमालयातील नसून स्वीडन या देशातील आहे. याची लिंक पुढील प्रमाणे ( https://www.youtube.com/watch?v=bjiq_8K_k8Q ). या १५.०४.२०१९च्या व्हीडीओखाली तो टाकणार्याने वर्णन देखील लिहले आहे ते असे: A sun dog ...