ग्रह आणि राशी यांची खोटी भीती
ग्रह आणि राशी यांची खोटी भीती : –य.ना.वालावलकर आपली सूर्यमाला आहे. तिला ग्रहमाला असेही म्हणतात. या मालेत सूर्य हा एकच तारा आहे. त्याच्या प्रकाशात मालेतील सर्व ग्रह, उपग्रह, लघुग्रह, उल्का, धूमकेतू्, चमकतात. सूर्याभोवती फिरतात. चंद्र स्वत:भोवती, पृथ्वीभोवती आणि पृथ्वीसोबत सूर्याभोवती फिरतो. सर्व उपग्रह असेच फिरतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे महासागर, पर्वत, वृक्ष, इमारती, प्राणी, पशु-पक्षी सर्व सूर्याभोवती फिरतात. आकाशात उडणारे विमानही सूर्याभोवती फिरत असतेच. सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून असे ग्रह आहेत. कुंडलीतील ग्रह :- सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, युरेनस, हर्षल, प्लुटो, राहू आणि केतू. खरेतर सूर्य तारा. चन्द्र उपग्रह. राहू-केतू हे काल्पनिक बिंदू. असे हे ज्योतिषांचे बारा ग्रह ! खगोलशास्त्रानुसार पृथ्वीपासून अंतरे (किलो मिटर) :--- (1)चंद्र :- 40 लक्ष..(2)सूर्य:- 15 कोटी..(3)बुध:- 10 कोटी..(4)शुक्र :- 5 कोटी .. (5)मंगळ:- 8 कोटी..(6)गुरू:-...