ग्रहण
*ग्रहण काळात परातीमध्ये 90 अंशात मुसळ कसे उभे राहते अशी ‘भाबडी’ विचारणा करणारी पोस्ट सध्या फिरत आहे त्यास हे उत्तर...* मुसळ हे एक सरळसोट लाकूड असते व त्याचा तळ (कुटण्याचे टोक) हे सपाट असते. तसेच त्याचा तळभाग जड व किंचित पसरट असतो. कारण तळ जेव्हढा वजनदार तेव्हढी त्याला जास्त स्थिरता प्राप्त होते व कुटण्याची क्रीयाहि चांगली होते. लहान मुलांना खेळण्यास देण्यात येणारी डोलणारी बाहुली आडवी केली तरी न पडता उठून उभी राहाते. कारण तिचा तळभाग जड केलेला असतो.ह्याचसाठी डबलडेकर बसमध्ये खालच्या मजल्यावर उभे प्रवासी घेतात, पण वरच्या मजल्यावर नाही. तसेच जहाजात इंजिनारूम्स वा सामान ठेवण्याच्या जागा बोटीच्या तळभागातच असतात. त्यामुळे तिचा तळभाग जड होऊन बोट पाण्यावर हेलकावे न खाता स्थिर राहू शकते. एवढेच काय पण विमानातही कार्गो म्हणजे सामान व त्याचे इंजिनही त्याच्या पोटात म्हणजेच तळभागात असते, त्यामुळेच विमान हवेतही फार हेलकावे न खाता स्थिरापणे प्रवास करू शकते. *या गुणधर्माला भौतिकाशास्त्रात गुरुत्वामध्याचा ( centre of gravity) गुणधर्म असे म्हणतात.* *म्हणूनच मुसळच काय अशा आकाराचे कुठलेही लाकूड सपाट पृष...