पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही?

प्रेशर कुकरची शिट्टी का होऊ द्यायची नाही? - शरद काळे, निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई. स्वयंपाक घरातून वेगवेगळे वास जसे सकाळ संध्याकाळ येत असतात तसेच काही आवाज देखील स्वयंपाक घराशी जोडलेले असतात. त्यातील एक आवाज आहे कुकरच्या शिट्टीचा! बऱ्याच गृहिणींच्या मनात कोणत्या पदार्थासाठी किती शिट्या व्हायला पाहिजेत हे गणित पक्के बसलेले असते. भातासाठी दोन, डाळ असेल तर तीन, राजम्यासाठी चार शिट्या अशी ही गणिते वर्षानुवर्षे सोडविली जात असतात. आईकडून किंवा सासूकडून (आमच्या जमान्यात!) ही शिकवण लेकीला किंवा सुनेला दिली जात असे. त्यात आपले काही चुकत तर नाही ना असा विचार देखील कधी मनात येत नाही. शालेय विज्ञानात शिकवितात की पदार्थ वाफेवर लवकर शिजतो. शिवाय वाफेवर शिजलेले पदार्थ दाताखाली येत नाहीत म्हणजेच चांगले शिजतात. त्या तत्वाचा वापर करून ज्या वैज्ञानिकाने प्रेशर कुकर हे उपकरण बनविले त्याचे नाव होते पपेन. त्याला शतशः धन्यवाद द्यायला हवेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की हा पपेन त्याच्या थडग्यात रडत आहे! घरोघरी वाजणाऱ्या कुकरच्या शिट्या त्याला ऐकायला जातात तेंव्हा तो तळमळून म्हणत असतो, &q